Mindblown: a blog about philosophy.

 • मराठी प्रेरणादायी विचार …..

  🪴 समजणं आणि समजुन घेणं यात खुप फरक आहे. समजण्यासाठी बुध्दी लागते आणि समजुन घेण्यासाठी मन. हे🙏🏻 🪴 ज्याच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे, ज्याच्याकडे मनशांती आहे, तो पैशांच्या मागे लागलाय. पण एकमेव भगवंतचा सेवेकरी असा आहे ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेकारण साधूसंत म्हणतात :- ज्याला पडल्या-पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत […]

 • मानवता

  एकादशीच्या दुसऱ्या दिवशी एक साधू एका सज्जन व्यापाऱ्याच्या दुकानात दान मागण्यासाठी आला.त्या सज्जन व्यापाऱ्याने एक रुपयाचे नाणे काढून त्या साधूला दिले. साधूला तहान लागली होती, तो म्हणाला बाबूजी, मला प्यायला एक ग्लास पाणी द्या, घशाला कोरड पडली आहे. सज्जन व्यापारी रागात म्हणाला तुझ्या बापाचे नोकर बसलो आहोत का इथे? आधी पैसे, आता पाणी, काही वेळाने […]

 • स्वत:ची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करा…

  एक गाढव होते. आणि त्याचे स्वप्न होते की आयुष्यात काहीतरी मोठे करायचे की ज्यामुळे आपण मेल्यानंतरही लोकं आपलं नाव घेतील. त्याचा एक मालक होता. त्याचही स्वप्न होत तो त्याच्या क्षेत्रात खुप मोठा व्यापारी बनावे.तो त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपल्या गाढवाकडून दिवस रात्र कष्ट करुन घ्यायचा. तो त्या पाठीवर जास्तीत जास्त माल लादत असे की ज्याच्यामुळे […]

 • संकटांना सामोरे जा…..

  फार पूर्वी एक कारागिरी पुतळा बनवण्यासाठी जंगलात दगड शोधायला गेला होता. तेथे त्याला मूर्ती तयार करण्यासाठी एक अतिशय चांगला दगड सापडला. दगड घेऊन घरी परत येत असताना वतेतील एका बाजूला असलेला अजून एक दगड त्याने पाहिला हा दगड नंतर काहीतरी कामाला येईल असा विचार करून त्याने तोही उचलला. घरी आल्यानंतर चांगल्या दगडापासून मूर्ती बनविण्यापासून होतोडा […]

 • चतुर कावळा

  कथा फार पूर्वी, एका राज्याच्या महालाच्या बागेत एक कावळा त्याच्या बायको सोबत राहत होता. तो बागेतील सर्वात मोठ्या झाडावर राहत होता. त्याच झाडाखाली अजगराच्या छिद्र होते. अजगर तिथे राहतो हे कावळ्याला माहीत होते, तरीही तो त्या झाडावर बऱ्याच दिवसांपासून राहत होता. दोन्ही कावळे सकाळी अन्नाच्या शोधात निघायचे आणि संध्याकाळी परत यायचे. असाच वेळ जात होता. […]

 • चमचे चोर

  एका श्रीमंत गृहस्थाकडे मेजवाणीसाठी चाळीस जणांना बोलावले होते. त्यापैकी वीसजणांनी श्रीखंडाच्या वाटीत दिलेला एकेक चांदीचा चमचा जेवण झाल्यावर चाटून व स्वच्छ करून आपापल्या खिशात घातला. नोकराने ही गोष्ट मालकांच्या दृष्टीस आणताच मालक हाती लागलेले वीस चमचे घेऊन निमंत्रित पाहुण्यांसामोर आले आणि त्यांना उद्देशून म्हणाले, आपण सर्व जण माझ्या निमंत्राला मान देऊन जेवायला आलात, म्हणून मला […]

 • परोपकाराचे फळ

  कथा एकदा एका गावात काही गावकरी एका सापाला मारत होते, त्याच रस्त्याने संत एकनाथ चालले होते. गर्दी पाहून संत एकनाथही तेथे पोहचले आणि म्हणाले, बंधुनो तुम्ही या प्राण्याला का मारताय, साप असला म्हणून काय झालं हा सुद्धा एक आत्मा आहे? तेवढ्यात गर्दीत उभा असलेला एक तरुण म्हणाला, “आत्मा आहे तरी तो का चावतो? त्या व्यक्तीचे […]

 • जिभेचा रस

  एक म्हातारा प्रवासी थकला आणि राहण्यासाठी जागा शोधू लागला. एका बाईने त्याला तिच्या घरामध्ये राहण्यासाठी जागा सांगितली. म्हातारा तिथे शांत झोपला. सकाळी उठल्यावर, पुढे जाण्यापूर्वी त्याला वाटले की ही चांगली जागा आहे , इथे खिचडी शिजवावी आणि नंतर ती खाऊन पुढे प्रवास करावा. म्हाताऱ्याने तिथे पडलेली सुखी लाकडं गोळा केली आणि विटांची चूल केली व […]

 • खरा वेडा कोणं

  एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्हणजेच पूर्ण बरा झाला आहे का नाही हे पाहण्यासाठी अनेक चाचण्यांना तोंड द्यावे लागत असे. त्यातील शेवटच्या चाचणीमध्ये वेड्यांसामोर एक कोरे चकचकीत पाच रुपयाचे नाणे आणि एक मळकट पन्नास रुपयांची नोट ठेवली जाई. त्यातील फक्त एकच गोष्ट त्याला उचलण्यास सांगितली जाई . वेड्याने जर पन्नास रुपयाची नोट उचलली तर […]

 • बाजीगर

  एका महाविद्यालयात संजय नावाचा एक विद्यार्थी शिक्षण घेत होता.अभ्यासाबरोबरच तो खेळातही प्रवीण होता. तो एक उत्कृष्ट नेमबाज होता. चांगले गुण व विनम्रता यामुळे तो शिक्षकामध्येही प्रिय होता. एकदा महाविद्यालयात वार्षिक महोत्सव होता. यात नेमबाजीचीही स्पर्धा ठेवण्यात आली होती. इतर ठिकाणाहून अनेक विद्यार्थ्यानी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. प्रचार्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांशी परिचय करून घेताना दुसऱ्या शाळेतील […]

Got any book recommendations?