आत्मविश्वास

एकदा एक बैल आपल्या घरचा रस्ता चुकला एका घनदाट जंगलांमध्ये गेला , तो खूप वेळ फिरला पण त्याला बाहेर जाण्याचा मार्ग सापडेना कुप फिरल्यानंतर तो एका वाघाच्या गुहेत गेला आणि निवांत बसला . संध्याकाळ झाल्यानंतर वाघ आपल्या गुहेत यायला निघाला तो गुहेजवळ आल्यानंतर त्याला बैलाच्या पायाचे ठसे गुहेत जातानाचे दिसले पण बाहेर जाताना दिसले नाही .

वाघ थोडा घाबरला त्याने बाहेरूनच आवाज दिला , कोण आहे गुहेत बैल जागा झाला तो खूप घाबरला पण त्याने विचार केला आपण जर घाबरलो तर वाघ आपल्याला खाईन त्याने डोके चालवले तो आतून बोलला बर झालं कोण तरी आल मी दोन दिवस उपाशी आहे , आता मला काहीतरी चांगली मेजवानी होईन ,

“हे ऐकून वाघ घाबरला आणि पळून गेला हा प्रकार एका कोल्हयाने पहिला तो पळत वाघाच्या मागे गेला ,आणि त्याला सांगितले की तुमच्या गुहेत एक बैल आलाय तो काही तुम्हाला खाणार नाही उलट तुम्हीच त्याची शिकार करून त्याला खा तो म्हणाला मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवत कोल्हा मग म्हणाला तुम्ही माझी शेपटी तुमच्या पायाला बांधा आणि मी तुमच्या सोबत येतो असे म्हणून ते दोघे ही गुहेकडे निघाले गुहेच्या जवळ गेल्यावर बैलाने समजून घेतलं की कोल्हयाने काय तरी फूस लावलिय म्हणून बैलाने शक्कल लावली ,आणि तो आतून म्हणाला , किती वेळ लावला कोल्हया वाघाला आणायला मला फार भूक लागली आहे .

हे ऐकल्यानंतर वाघ घाबरला व सुसाट पळत सुटला आणि कोल्हयाची शेपटी बांधली असल्यामुळे माग कोल्हा पूर्णपणे फरपटत चालला होता .

अश्या तऱ्हेने बैलाने घाबरून न जाता बुद्धीचा वापर करून स्वतचा जीव वाचवला .

बोध ,

कठीण काळात कधीही आपला आत्मविश्वास गमावू नका .


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *