अंतरीची बुद्धी खोटी

संत श्री तुकाराम महाराज ….

उंदीराणे बेडकासी मैत्री केली ,पण बेडकांच्या अंतकरणी उंदराला पाण्यात बुडून मारणे हा कावा .

या दोस्तीसाठी , आणाभाका घेऊन , एक दोरीने , उंदराचा पाय व बेडकाची मान , दोघांनी बांधली . काही वेळातच काठावरील बेडकांनी पाण्यात उडी मारली थेट तळाशी , उंदीर विनंती करी , बाहेर चल नाहीतर माझा जीव जाईल , बेडूक हसला .

उंदीर मेला , पाण्यात फुगला वर तरंगत राहिला . वजन जास्त असल्याने बेडकाची घालमेल झाली .

तेवढ्यात एका घारीची नजर , पाण्यात तरंगत असणाऱ्या उंदरावर गेली .

तिने झडप घातली उंदीरासह बेडूक ही प्राणास मुकले ..

उंदीरावर कुरघोडी करणे , बेडकाला महाग पडले .

भरल्या पोटी वाईट !


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *