संकटाची मालिका

कथा

मनुष्याच्या आयुष्यात एकदा का संकटाची मालिका सुरू झाली की ती संपता संपत नाही . परंतु या संकटातून सुटका करून घेण्यासाठी जसे मनुष्याच्या प्रयत्नांची गरज असते तशीच त्याला कळत न कळत सहकार्य मिळत असते .

एका लहानशा गावातील एका झाडावर खूप सारे कावळे बसले होते . पावसाळ्याचे दिवस होते . बाहेरील वातावरण ढगांनी भरून आले होते . अगदी दुपारच्या वेळेस अंधार झाला होता . केव्हा पाऊस पडेल सांगता येत नव्हते . त्यामुळे सर्वच पक्षी घरट्यात जाऊन बसले होते. पण जागेच्या अभावी सर्वच कावळे आपल्याला सुरक्षित जागा मिळावी महणून एकमेकांशी भांडत होते .

तेवड्यात एक मैना उडत उडत आली अन त्याच झाडावरील एका फांदीवर जाऊन बसली. मैनेला झाडावर बसलेली पाहून सर्वच कावळे तिच्यावर धाऊन गेले . बिचारी मैना या कावळ्यांना खूप विनवण्या करत होती,पण कावळे काही एकायला तयार नव्हते , ते काय तिचे एकेणा ती म्हणाली मला फक्त आजची रात्र इथे राहून द्या . मी माझ्या घरचा रास्ता चुकलिय , कावळे काय ऐकणा , ते म्हणाले तू इथू जा नाहीतर आम्ही सगळे मिळून तुझ्या अंगावर येऊ आणि तुझा जीव घेऊ . मैना म्हणाली हे सर्व तर देवाचे आहे . तुम्ही का भांडताय ते कावळे म्हणाले आम्ही देवाला काय मानत नाही . शेवटी मैना जवळच एक झाड होते त्या झाडावर गेली आणि थोड्याच वेळात जोराचा पाऊस सुरू झाला , पावसासोबत गारा पण पडू लागल्या . त्या पावसाच्या वाऱ्यात मैना ज्या झाडावर बसली होती त्या झाडाची फांदी तुटून खाली पडली व तिथे चांगला आडोसा तयार झाला . पाऊस रात्रभर चालू होता मैना रात्रभर त्या अडोशयाल झोपली .

सकाळ झाली मैना उठून पाहते तर काय जवळच तिला विचित्र दृश्य पाहायला मिळायल तिथे बरेच कावळे मरून पडले होते मैना तिथून जात असताना मरणाच्या दारात असणाऱ्या एका कावळ्याने तिला विचारले की तू जीवंत कशी राहिली . त्यावर ती म्हणाली मी रात्रभर देवाची प्रार्थना करत होते , त्यानेच मला या संकटातून वाचवले आहे . दु:खात देवच आपली सुटका करू शकतो हा माझा विश्वास सार्थ ठरला .’

बोध

देवच आपली संकटातून सुटका करू शकतो . ती फार मोठी शक्ति शक्ति आहे . अनेक अडचणींवर मात करू शकतो .अप्रत्यक्षपणे मदतच होते फक्त आपला त्यावर विश्वास असला पाहिजे


Posted

in

by

Tags:

Comments

One response to “संकटाची मालिका”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *