धर्म नीती

कथा

एका शिकऱ्याने शिकारीवर बाण सोडला . बाणावर सर्वात घातक विष लावले होते .

पण शिकाऱ्याचे लक्ष्य चुकल्याने बाण हरणाएवजी बाण एका एका फळे , फुले असणाऱ्या झाडाला जाऊन लागला . झाडात विष पसरले . ते झाड सुकू लागले . त्यावर राहणारे सर्व पक्षी एक एक करून ते झाड सोडून गेले .

एक धर्माभिमानी पोपट अनेक वर्ष त्या झाडाच्या पोकळीत राहत असे . पोपट झाड सोडून गेला नाही ,पण आता बहुतेक वेळा झाडांवरच राहत असे .

अन्न , पानी न मिळाल्याने पोपट ही आता सुकून जात होता . प्रकरण देवराज इंद्रापर्यंत पोहचले . मारणाऱ्या झाडसाठी प्राण देणारा पोपट पाहण्यासाठी इंद्र स्वता तिथे आले .

पोपटाने त्यांना प्रथमदर्शनी ओळखले . इंद्र म्हणाला , हे बघ भाऊ , या झाडाला ना पाने ,ना फळे , ना फुले . आता हे झाड पुन्हा हे झाड हिरवे होईल असे कोण म्हणेल , झाड पुन्हा जगण्याची आशा नाही . जंगलात अशी किती झाडे आहेत ? ज्यांची मोठी पोकळी पानांनी झाकलेली आहे . झाडेही फळे आणि फुलांनी बहरलेली आहेत .

तेथून तलावही जवळ आहे . तू तिकडे का जात नाही ?

पोपट उत्तरला , मी जन्मलो इथेच , वाढलो यावरच , त्याची गॉड फळे खाल्ली . या झाडाने मला कितेक वेळा संकटातून वाचवले आहे . मी त्याचा आनंद लुटला आहे . आणि आज त्याचवर वाईट वेळ आली तर मी माझ्या आनंदासाठी ते सोडू का ? ज्याच्या सोबत मी सुख उपभोगतो त्याच्यासोबत दुखही भोगीन , यातच मी आनंदी आहे .

तू देव असूनही मला वाईट सल्ला का देत आहेस ? असे बोलून पोपटाने इंद्राचे बोलणे बंद केले . पोपटाचे हे बोलणे ऐकून इंदरदेव प्रसन्न झाले व म्हणाले मी मी तुझ्यावर खुश आहे . कोणताही वर माग .

पोपट म्हणाला माझ्या या सुंदर झाडाला पूर्वीसारख हिरवे कर . देवराजाने झाडाला फक्त अमृत च नाही तर अमृतचा वर्षाव केला . झाडाला नवीन कोंब फुटले . ती पूर्वीसारखी हिरवीगार झाली. त्याला अनेक फळेही आली .

पोपट खूप दिवस राहून , मृत्युनंतर देवलोकात गेला .

या कथेतून असे समजते , जो आपल्या आश्रयदात्याचे दुख आपले मानतो त्याचे कष्ट दूर करण्यासाठी देव स्वता: येतो . वाईट काळात माणूस भावणीकदृष्ट्या कमकुवत होतो . त्यावेळी जो त्याला आधार देतो त्याच्यासाठी तो आपला जीव पणाला लावतो .

बोध

कोणाच्या सुखाचा सोबती बना वा न बना पण दुखाचा सोबती नक्कीच व्हा . ही धर्मनीती आहे .


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *