फक्त प्रेम करा

सख्खा भाऊ , सख्खी बहीण , सख्खी मैत्रीण सख्खे काका , सख्खी काकू , सख्खी मावशी नेमक काय असतं ही ” सख्ख प्रकरण ?”

सख्खा म्हणजे आपला सखा . सख्खा म्हणजे जवळचा . जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही , केव्हाही काहीही सांगू शकतो . त्याला आपल म्हणाव त्याला सख्ख म्हणाव !

सध्याच्या कलियुगात , आपण काय करतोय हे सख्ख्या नातेवाईकांच्या कानावर पण पडता नये इतकी खबरदारी घेतली जाते . तिथे सख्खे नसते पथ्य असते .

ज्याच्या जवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो ,मोठ्याने हसू शकतो किंवा काळजातलं दुख सांगून रडूही शकतो त्याला सख्ख म्हणाव आपलं !

ज्यांच्याकडे गेल्यानंतर आपलं स्वागत होतं होणारच असत आपल्याला पाहून त्याला हसू येणारचं असतं आपमानांची तर गोष्टच नसते फोन करून का आला नाही म्हणून तक्रार ही नसते !

पंढरपूरला गेल्यावर विठ्ठल म्हणतो का या या फार बरं झालं रुक्मिणी काया पाठीवरून हात फिरून म्हणते का , किती तबेत खराब झाली ? कशी आहेस ? सुकलेला दिसतोस काय झालं ? नाही म्हणत .

मग दर्शन घेऊन निघताना वाईट का वाटत ? पुन्हा एकदा मागे वळून का पहावस वाटत ? प्रेम, माया ,आपुलकी , विश्वास म्हणजेच “आपलेपणा !”

हा आपलेपणा काय असतो ?

आपलेपणा म्हणजेच भेटण्याची ओढ भेटल्याननर बोलण्याची ओढ बोलल्यानंतर ऐकण्याची ओढ निरोप घेण्याआधि पुन्हा भेटण्याची ओढ !

ज्याला न बोलताही आपलं दुख कळत त्याला आपलं म्हणाव आणि चुलत , मावस असलं तरी सख्ख म्हणावं !

मी त्याचा आहे आणि तो माझा आहे ही भावना दोघांच्याही मनात सारखीच असणे .. म्हणजेच “आपलेपणा ! “

एक शब्दही न बोलतही ज्याला पाहिल्या पाहिल्या डोळे भरून येतात आणि निसनकोचपणे गालावरून ओघळू लागतात तो आपला असतो “तो सख्खा असतो !”

लक्षात ठेवा ,

ज्याला दुसऱ्यासाठी सख्ख होता येत त्यालाच कुणीतरी सख्ख असत , बाकी सगळी परिचितांची यादी असते नको असलेल्या माणसांची गर्दी असते !

तुम्हीच सांगा ..

फक्त आईची कूस एक आहे म्हणून सख्ख म्हणायचं का ? ज्याला तुमच्या दुखाची जाणीव नाही त्याला सख्ख म्हणावं का ?


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *