दोन हिरे

कथा

एका व्यापाऱ्याला एक भव्य उंट विकत घ्यायचा असतो . आणि एक उंट निवडल्या नंतर त्या उंटाची बोलणी सुरू झाली . शेवटी बोलणी झाली किंमत ठरली व व्यापारी उंट घरी घेऊन आला . घरी पोहचल्यानंतर घरी पोहचल्यावर व्यापऱ्याने नोकराला उंटाचा खोगीर काढण्यासाठी बोलावले . काजव्याच्या खाली नोकरास एक लहान मखमली पिशवी सापडली ती मौल्यवान हीऱ्यांनी भरलेली होती . सेवक ओरडला ,”मालक तुम्ही एक उंट विकत घेतला ,परंतु त्या बरोबर विनामूल्य काय आले आहे . ते पहा !”

व्यापारी देखील चकित झाला ,त्याने आपल्या नोकरच्या हातात हिरे पाहिले . ते सूर्यप्रकाशात आणखी चमकत होते . व्यापारी म्हणाले “मी उंट खरेदी केला आहे हिरे नव्हे <मी त्वरित परत करावे !” नोकर मनात म्हणाला माझा मालक किती मूर्ख आहे . मालक काय आहे हे कुणालाही कळणार नाही !” तथापि व्यापाऱ्याने ऐकले नाही ,तो बाजारात गेला आणि ती हिऱ्याची पिशवी त्या विक्रेत्याला परत केली उंट विक्रेता खुश झाला,आणि म्हणाला मी विसरलो होतो की मी माझे हिरे खोगीरखाली लपवले होते . आता आपण बक्षीस म्हणून कोणताही एक हिरा निवडा ! व्यापारी म्हणाला , मी उंटांसाठी योग्य किमत दिलेली आहे म्हणून मला कोणतेही बक्षीस नको आहे . जितका व्यापारी नकार देत होता , तितकाच उंटावाला आग्रह करत होता .

शेवटी व्यापारी हसला आणि म्हणाला खरतर मी थैली परत देण्याआधीच मी दोन मौल्यवान हिरे माझ्याकडे ठेवले आहे . असे म्हणल्यानंतर उंटावाला चिडला त्याने थैली रिकामी मोकळी आणि हिरे मोजले . पण त्याच्या लक्षात आले की सर्व हिरे जशे च्या तसे आहे अन एकही हिरा कमी नाही तेव्हा तो म्हणाला , माझे तर सर्व हिरे आहेत मग तुम्ही ठेवलेले दोन हिरे कोणते ?

व्यापारी म्हणाला ..

“माझा प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान .”

विक्रेता मुक होता !

यापैकी दोन हिरे आपल्याकडे आहेत का नाही हे शोधण्यासाठी आपण स्वतामध्ये पहावे .

बोध

ज्याच्याकडे हे दोन हिरे आहेत ,’स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा तोच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति आहे .


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *