ब्रेक

एकदा फिजिक्सच्या टिचरणे मुलांना प्रश्न विचारला ‘कारमध्ये ब्रेक्स का लावले असतात ?” त्यावर निरनिराळी उत्तरे आली ,थांबण्यासाठी ,वेग कमी कमी करण्यासाठी, अपघात टाळण्यासाठी परंतु सर्वात चांगले उत्तर होते ,जास्त वेगाने जाता येण्यासाठी ..! गोंधळले असालं ना आशा उत्तराने .. मग असे कसे ..? जरा विचार करा .. जर तुमच्या कारमध्ये ब्रेक्सच नसते तर तुम्ही जास्तीत जास्त किती वेगाने गाडी चालवाल ? कारला ब्रेक आहेत म्हणूनच वेगाने गाडी चालवण्याचे धाडस करू शकता , तुमच्या इच्छित स्थळे पोहचू शकता .

जीवनातही तुम्हाला अनेक रूपात ब्रेक मिळतात . तुम्हाला वाटते की , ते तू म्हाला वेळोवेळी टोकतात , अडवतात ,शंका , कुशंका अभ्या करतात ,तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करतात . म्हणून तुम्ही त्यांच्या विषयी चिडचिडे होता . ब्रेक नसते तर आपण कुठे तरी भरकटलो असतो , संकटात सापडलो असतो .

म्हणूनच जीवनात अधूनमधून येणाऱ्या ब्रेक्सची जान ठेवा .


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *