हरवलेली मैत्री

“ओस पडल्या ओसऱ्या साऱ्या ओस पडल्या त्या बैठका हल्ली मित्रांना भेटण्यासाठी शोधाव्या लागतात तारखा “

“व्हायची तिथे रोजच्या रोज सुख दुखाची उजळणी विचारांची देवाणघेवाण अन दिलखुलास गप्पा ”

“कट्टया कट्टयावर रंगायचे गप्पाचे फडावर फड कुणी मराठी कुणी हिन्दी इंग्रजी झाडायचे फडाफड”

“शिकलेले मित्र मिरवायचे अभिमानाने पण एकमेकांशी वागायचे आदराने आणि सलोख्याने”

“नव्हती जातीधर्मात तेड नव्हते आपसात हेवेदावे एकमेकांच्या आनंदात सहभागी व्हायचे मनोभावे ”

“मित्रांनो गेले ते दिवस मनमुराद हसण्याचे अन आले हे दिवस मनमारून जगण्याचे “………………


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *