प्रेम

आपल्या मनासारखे वागावे का दुसऱ्यांच्या मनासारखे ? हे समजावणारी सुंदर कथा

   बायकोने घरात मांजर पाळलेल . तिचं ते खूप लाडकं . ती जेवायला बसली की तिलाही घेऊन बसायची . एका वाटीत दूध भाकर कुसकुरूं द्यायची . पण नवऱ्याला ते अजिबात आवडायचं नाही . उघडं दिसेल त्या भांड्यात तोंड घालायची सवय होती . त्याचा त्याला प्रचंड राग यायचा .             
   एकदा नवरा जेवायला बसलेला , आणि नेमकं मांजरीने तोंड घातलं . नवरा चिडला आणि रागारागाने शेजारी असलेला पाटा त्यांच्या डोक्यात घातला . घाव वर्मी बसल्याने मांजर बराच वेळ निपचित पडून राहिलं. मेलं की काय अशी शंका येत होती तेवड्यात अंग झटकून उठून बसलं. त्याने हळूच नवऱ्याकडे हसून पाहिलं ,आणि चक्क सॉरी यार मी मघाशी तुझ्या ताटात तोंड घातलं . क्या करे आदत से मजबूर हूं, पुन्हा नाही असं करणार . असं मानसारख बोललं . नवरा वेडा व्हायचा बाकी होता ..! त्यानंतर मांजर नम्र आणि आज्ञाधारक झालं. त्यानंतर ताटात तोंड घालणे सोडा दारतलं पेपर आणून दे ,टी पोयवरचा चश्मा आणून दे अशी बारीकसारीक कामं ते करू लागलं. मग काय.नवऱ्याची आणि त्याची छान गट्टी झाली. ऑफिसमधून येताच मांजर दिसलं नाही तरी तो अस्वस्थ व्हायचा .अगं मण्या दिसतं नाही गं कुठं ?बायकोला सतत विचारत राहायचं . असेच काही दिवस गेल्यावर एकेदिवशी सोसायटीच्या गेटसमोर बेवारस कुत्री आणि मांजर पकडून नेणारी गाडी येऊन थांबली. मण्याने खिडकीतून टी गाडी पहिली. त्याच्या मनात काय आलं काय माहीत,पण धावत जाऊन तो गाडीमध्ये बसला. नवऱ्याने हे बघितले. हातातला पेपर बाजूला टाकून तो मण्यामागे धावला मन्या गाडीमध्ये निवांत बसलेला. नवरा, मण्या अरे इथं गाडीत का बसलाय ही गाडी बेवारस मांजरसाठी आहे. तुझ्यासाठी नाही. मला माहितीये !पण मला जायचंय आता. मण्या शांतपणे बोलला. मण्या अरे अस काय करतोयसं ?तू किती लाडका आहेस आम्हा दोघांचा. माझं तर पानही हालत नाही तुझ्याशीवाय. तू क्षणभर नजरेआड गेलास तरी मला करमत नाही. मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू खुशाल निघालास? मण्या गोड हसला आणि म्हणाला तू माझ्यावर प्रेम करतोस?माझ्यावर "? म्हणजे काय शंका आहे का तुला ? मित्रा अरे मी जेव्हा माझ्या मनासारखं वागत होतो हवं तिथे तोंड घालतं होतो तेव्हा मी तुझा नावडता होतो. सतत माझा रागराग करत होता. अगदी माझ्या जिवावर उठला होतास. पण जेव्हा मी तुझ्या मनासारख वागू लागलो, तूला हवं तसं करू लागलो तेव्हा तुला आवडू लागलो. तेव्हां तू माझ्यावर प्रेम करू लागला त्यात नवलं काय?

बोध 
  आपल्या मनासारखं वागणाऱ्या व्यक्तीवर कुणीही प्रेम करत. 
अवघड असतं ते त्याच्यावर प्रेम करणं ,त्याला समजून घेणं , जेव्हां तो आपल्या मनासारखं वागतं नसतो .

Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *