काळा ठिपका

कॉलेजमधील एका गुरुजीने एके दिवशी अचानक वर्गावर जाहीर केले की –

“आज मी तुमची सरप्राइज टेस्ट घेणार आहे .”

असे म्हणून गुरुजीने प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न पत्रिका दिली . ती हातात पडताच जवळपास सर्व विद्यार्थी चकित झाले . काहीजण तर बावचळून गेले . कारण प्रश्नपत्रिका पूर्ण कोरी होती. कसलेच प्रश्न नव्हते.फक्त त्या पेपरच्या मध्यभागी एक छोटासा काळा ठिपका होता. गुरुजी म्हणाले ,”बावचळून जाऊ नका तुम्हाला पेपरवर जे काही दिसतय त्यावर दहा ओळी लिहायच्या आहेत.”मुलांनी मग जमेल तसे उत्तर लिहले . सगळ्यांचे लिहून झाल्यावर गुरुजींनी पेपर जमा केले आणि एकेकाचे पेपर मोठ्याने वाचायला सुरवात केली . कुणी लिहले होते ,तो ठिपका म्हणजे मी आहे , कुणी लिहले होते . माझे जीवन आहे . वगैरे वगैरे !सगळे झाल्यावर गुरुजी म्हणाले ,

“तुम्ही सर्वजण नापास झालेले आहात .”

सर्वजन दचकले . मग गुरुजी म्हणाले , तुम्ही सर्वानी एकाच दिशेने विचार केला आहे . सर्वांचा फोकस काळ्या ठिपक्यावरच होता . थिपक्या भोवती खूप मोठा “पांढरा”पेपर होता हे मात्र कुणीच लिहले नाही . आपल्या जीवनात देखील असेच होते . आपल्याला खरेतर जीवणरूपी खूप मोठा पेपर मिळालेला असतो . ज्यात आनंदाचे रंग भरायचे असतात पण आपण ते न करता केवळ काळ्या ठिपक्याकडे पाहतो .

जीवनातल्या अडचणी ,मित्र मैत्रिणी सोबतचे वाद ,गैरसमज ,घरातील विसंवाद हे सगळे ते काळे ठिपके आहे .

आपण त्यावर फोकस करतो आणि खूप मोठा पांढरा पेपर हातात आहे त्याकडे दुर्लक्ष करतो. “खरेतर पांढऱ्या पेपरच्या आकारपेक्षा तो काळा ठिपका तुलनेने खूप लहान असतो . पण आपण त्यातच गुंतून राहतो . आणि मोठा पांढरा भाग दुर्लक्षित करतो .

बोध

म्हणून यापुढे एक लक्षात ठेवा . काळा ठिपका न बघता पांढरा पेपर पाहायला शिका !


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *