घेण्यापेक्षा देणे आनंदायक आहे .

कथा

एक वडील आणि मुलगा एकत्र फिरायला निघाले ,ते दूरच्या शेताकडे निघाले ,तेव्हा मुलाने पाहिले की ,वाटेत एक जुने जोडे पडले आहेत ,जे जवळच्या शेतात काम करणाऱ्या गरीब मजूरचे होते. मूलगा लक्ष्मीकांतला विनोद सुचला आणि वडिलांना म्हणाला आजची संध्याकाळ थोड्या खोडसळपणे संस्मरणीय का करू नये ,शेवटी मजा हेच खरे सुख स्त्रोत आहे . वडिलांनी नासमज मुलाकडे गोंदळून पाहिल . मुलगा म्हणाला चला हे जोडे कुठेतरी लपऊया आणि झुडपामागे लपुया . खूप मजा येईल जेव्हा तो मजूर त्याना इथे जोडे न सापडल्याने घाबरेल ,तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा असेल आणि त्याचा आनंद मी आयुष्यभर लक्षात ठेवेन . मुलाचे बोलणे ऐकून वडील गंभीर झाले आणि म्हणाले -बेटा !

गरीब आणि दुर्बलांना आवश्यक असलेल्या गोष्टीबद्दल कधीही घानेरडी चेष्टा करू नये . ज्या गोष्टींची आपल्या नजरेत काही किमत नाही ,त्या त्या गरीब माणसासाठी अनमोल आहेत . आजची संध्याकाळ तुम्हाला अविस्मरणीय बनवाची असेल तर आपण या बुटामध्ये काही नाणी टाकुया आणि गुपचूप पाहूया याचा मजुरावर काय परिणाम होतो . वडीलांनीही तसेच केले आणि झुडपात लपले . मजूर लवकरच आपले काम उरकून बुटांच्या ठिकाणी आला . बुटात एक पाय ठेवताच त्याला काहीतरी अवघडल्यासारख वाटलं त्याने बूट हातात घेतला आणि आत काही नाणी पडलेली दिसली . त्याला खूप आचर्य वाटले आणि टी नाणी हातात घेऊन अतिशय काळजीपूर्वक पाहू लागला . मग तो इकडे तिकडे पाहू लागला की त्याची मदत करणारी व्यक्ति कोण आहे ? दूरवर कोणी दिसले नाही म्हणून त्याने नाणी खिशात टाकली आता त्याने दूसरा जोड उचलला ,त्यातही नाणी पडलेली होती . मजूर भारावून गेला . जमिनीवर गुडघे टेकून बसून आकाशाकडे बघत तो रडू लागला . तो हात जोडून म्हणाला हे देवा !

आज तू कुठल्यातरी रूपात इथे आलास ,या वेळेवर मदत केल्याबद्दल तुमचे आणि ज्यांनी तुमच्या माध्यमातून ही मदत दिली त्यांचे लाख लाख आभार . तुमच्या मदतीमुळे आणि दयालुपनामुळे आज माझ्या पत्नीला औषध मिळेल आणि भुकेल्या मुलांना भाकर मिळेल . तू खूप दयाळू आहेस प्रभू !खूप खूप धन्यवाद..

मंजुराचे बोलणे ऐकून मुलाचे डोळे भरून आले . वडीलांनी मुलाला मिठी मारली आणि म्हणाले या गरीब माणसाचे अश्रु आणि तुला आयुष्यभर दिलेला आशीर्वाद या आनंदपेक्षा कमी काय आहे ? बाबा .. मला तुमच्याकडून जे काही शिकायला मिळाले त्याचा आनंद मला आतून वाटत आहे . आत एक विचित्र शांतता आहे . आज मिळालेला आनंद मी आयुष्यभर नाही विसरणार नाही .

बोध

आज मला शब्दांचा खरा अर्थ समजला जो मला आधी कधीच समजला नव्हता . आजपर्यंत मी मौजमज्जा हाच खरं तर आनंद मानत होतो ,पण आज मला समजले आहे की घेण्यापेक्षा देणे अधिक आनंदायक आहे .


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *