*जाहिरात*

“काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला, अजय ,अक्षय , शाहरुखसुद्धा विमलच खा म्हणाला”..

*बंद झाल्यात शिक्षण जाहिराती जुगार प्रसिद्ध झाला, हिन्दी मराठी कलाकारसुद्धा रमीच खेळा म्हणाला *..

“बंद झालेत मैदानी खेळ मोबाईल वेडा झाला, भर त्यात आयपीएलची त्यातही जुगार आला”.. ..

“क्रिस गेल कपिलसुद्धा केसरच खा म्हणाला, पोमॉलिव्ह का जबाब नही तोही विसरून गेला”..

“जॅकी सुद्धा गुटखा खातो तोही तेच म्हणाला , गुटख्यामुळेच धारिवालासुद्धा इतका श्रीमंत झाला” ..

“जुगार,दारू,गुटखा ,सिगरेट इतका प्रसिद्ध झाला , कुणीच नाही म्हणत याला तुम्ही आळा घाला”..

“बरबाद होत आहे तरुण पिढी समाज व्यसनी झाला, नाचवतो आणून गौतमी पाटील तरी नेताच महान झाला”..

“विनंती करतोय एक तुम्हाला स्वतालाच बंधने घाला , त्यांच्या होतात जाहिराती आणि समाज बरबाद झाला”..!

धन्यवाद ……


by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *