मुंगीची गोष्ट

कथा

एका रविवारी सकाळी ,एक श्रीमंत माणूस त्याच्या बाल्कनीत कॉफी घेऊन सूर्यप्रकाशाचा आनंद घेत होता ,तेव्हा एका छोट्या मुंगीने त्याचे लक्ष वेधून घेतले . मुंगी तिच्या आकारापेक्षा कितीतरी पट मोठे पान घेऊन चालली होती . त्या माणसाने तासा भराहून अधिक काळ ते पाहत होता . त्याने पाहिले मुंगीला तिच्या प्रवासात अनेक अडथळे येत होते ,त्या सर्व अडथळ्यांचा सामना करावा लागला. आणि मग ती आपल्या गंतव्यांच्या दिशेने चालू लागली . एका क्षणी या चिमूकल्या जीवाला अवघड जागा आडवी आली फरशीला तडा गेला होता . मोठी भेग होती . ती थोडावेळ थांबली ,विश्लेषण केले आणि मग मोठे त्या भेगेवर ठेवले ,पानावरून चालली ,पुढे जाऊन दुसऱ्या बाजूने पान उचलले आणि आपला प्रवास चालू ठेवला . मुंगीच्या हुशारीने तो माणूस मोहित झाला . त्याला सृष्टीच्या चमत्काराणे विचार करण्यास भाग पाडले . त्याच्या डोळ्यासमोर एक लहानसा प्राणी होता ,जो आकाराने फार मोठा नसलेला ,परंतु विश्लेषण ,चिंतन ,तर्क ,शोध आणि मात करण्यासाठी मेंदुनी सुसज्ज होता.


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *