कुबेराची रत्ने

प्रत्येक घरासमोर एक साधू उभा राहून हाक मारायचा .

आई ! मला मूठभर मोती दे . देव तुझे भले करील .. कल्याण करील. साधूनची ही विचित्र मागणी ऐकून महिलाही थक्क झाल्या . त्या म्हणाल्या -‘बाबा इथे लोकं पोत भरण्यात व्यस्त आहेत आणि तुम्हाला मोती कोण देनार ?पुढे जा ..

साधूला रिकाम्या हाताने गांव सोडून जाताना पाहून एका म्हातारीला त्याची दया आली. म्हातारीने साधूला जवळ बोलावले . त्याच्या हातावर एक छोटासा मोती ठेऊन ती त्याला म्हणाली साधू महाराज माझ्याकडे मूठभर मोती नाहीत . नाकाची नथणी तुटली होती तिचा मोती मिळाला आहे तेवढा मोती घ्या पण आमच्या गावातून असे मोकळ्या हाताने जाऊ नका . त्यावर सधुळा हसू आलं आणि तो तिला म्हणाला, आई ही माझी पिशवी फाटलेली आहे ह्यात तुझा मोती पडून जाईल राहुडे तुझ्याकडे. असे म्हणून साधू दुसऱ्या गावात गेला . दुसऱ्या गावात आल्यावर प्रत्येक घरासमोर साधू हाक मारायला लागला . त्या गावाच्या एका टोकाला एका शेतकऱ्याचे घर होते . तिथे मोती मागण्याची इच्छा त्याला तिथे घेऊन गेली . भाऊ मोत्याने भरलेला प्याला द्या देव तुमचे कल्याण करील ,सधुणी हाक मारली.

शेतकरी बाहेर आला त्याने अंगणात भिक्षूसाठी चादर टाकली आणि त्यांना बसायला सांगितले शेतकऱ्याने साधूला नमस्कार केला आणि पत्नीला हाक मारली .

लक्ष्मी !बाहेर साधू जी आले आहेत. शेतकऱ्याची पत्नी लगेच बाहेर आली व साधूनचे पाय धुऊन दर्शन घेतले . शेतकरी म्हणाला, लक्ष्मी बघ , साधूजीना खूप भूक लागली आहे . त्यांच्या जेवणाची त्वरित व्यवस्था कर .मूठभर मोती दळून त्यापासून रोटी बनव . तोपर्यंत मी मोत्यांची घागर घेऊन येतो . असे म्हणून रिकामी घागर घेऊन तो घराबाहेर गेला . काही वेळाने शेतकरी आला . तोपर्यंत लक्ष्मीने जेवण तयार केले होते .

साधूनी पोटभर जेवण केले. साधू खुश झाले . ते हसले व म्हणाले बऱ्याच दिवसांनी कुबेराच्या घरचे अन्न खायला मिळाले आहे . मला खूप आनंद झाला . आता मला तुमची आठवण येत राहील . यासाठी मला कानभर मोती द्या . त्यावर शेतकरी हसला आणि म्हणाला -साधू महाराज मी एक अशिक्षित शेतकरी आपणास मोती कानभर कसे देऊ . आपण खूप ज्ञानी आहात म्हणून आम्हीच आपणाकडून कानभर मोत्याची अपेक्षा ठेवतो . तुझ्यासारखा कुबेर भंडारी भेटलाकी मी पोटभर जेवतो . साधू शेतकऱ्याकडे पाहून म्हणाला . जो पिकाचे धान्य ,पाण्याचे थेंब आणि उपदेशतील शब्दांना मोती समजतो ,तोच खरा कुबेर .

मी तिथे पोटभर जेवण करतो ,मग ते जेवण डाळ -रोटी असो किंवा चटणी -भाकर असो. आनंदाचे मीठ त्यात चव वाढवते . असे म्हणून साधू पुढे निघून गेले ..

बोध

पृथ्वीवर फक्त तीन रत्ने आहेत पाणी ,अन्न ,आणि सुभाषित . दगड ,हीरे ,माणिक ,मोती इत्यादींना फक्त मूर्ख लोकं रत्न म्हणतात …


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *