आनंदाचे झाडं

आनंदाचे झाडं

आनंदाच्या झाडाचं गणित कृष्णानं सत्यभामेच्या अंगणात लावलेल्या प्राजक्ताच्या झाडासारखं असतं. झाड सत्यभामेच्या अंगणात आणि फुलं मात्र पडायची रुक्मिणीच्या अंगणात .. रुक्मिणीला झाडाचं मूळ काय शोधता आलं नाही, पण प्राजक्ताच्या सुगंधाचा आनंद मात्र मिळाला . सत्यभामेचा चडफडांत झाला तो झालाच ,कारण तिनं मूळ शोधायचा प्रयत्न केला व ते फुलांच पडणं बंद करता आलं नाही . त्यामुळे अंगणात असणाऱ्या त्या झाडाच्या सहवासाचा आनंद मात्र तिला घेता आला नाही . रुक्मिणीन मात्र झाडाच्या मुळांचा शोध घेण्याचा नाद सोडला आणि अंगणात पडणाऱ्या फुलांचा आनंद घेत राहिली .

मित्रांनो ,

आनंदाचं तसच असतं . तो कुठू मिळतोय याचा शोध घेत राहिला तर आनंद संपून जातो , उरते फक्त बेचैनी

आनंद घ्यावा आणि द्यावा …..प्रत्येक क्षण महोत्सव करावा .. तो कुणामुळे कशामुळे याचा विचार शक्य झाल्यास नंतर करावा , आणि तोही फक्त कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून …….

धन्यवाद ………..


by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *