विश्वासघातकी लोकं

*सर्वच विश्वासपात्र असतात असे नव्हे , तर काही विश्वासघात देखील करतात ..!*

मांजरीची आणि वाघाची गोष्ट ऐकली असेल . वाघाची माय मेलेली असती . त्या वाघाचे पालन पोषण मांजर करते . मांजर वाघाला जगाशी कसे लढायचे आपला बचाव कसा करायचा याचेही शिक्षण देते. वाघाची जात विश्वासघात करणारी असते . हे मांजरीला माहिती असल्याने मांजरीने सर्व बचावाचे डाव वाघाला शिकवले पण एक मात्र तिने वाघाला शिकवला नाही . वाघ मोठा झाला . एके दिवशी वाघाला कुठेच शिकार न मिळाल्याने तो उदास होऊन घरी आला . घरी आल्यानंतर तो मांजरीकडे बघतो त्याच्या मनात मांजरीला खाण्याचा विचार येतो आणि तो मांजरीच्या मागे पळू लागला. वाघाच्या मनातील भाव मांजरीने ओळखला आणि ती पुढे पळू लागली पळत असताना तिला तो डाव आठवला जो तिने वाघाला शिकवला नव्हता . नंतर लगेच शेजारच्या एका झाडावर चढते आणि वर जाऊन बसते . वाघ झाडाखाली येतो आणि मांजरीला म्हणतो , आई!तू मला बचावाचे सर्व डाव शिकवले पण झाडावर चढायचे का शिकवले नाही . त्यावर मांजर काय म्हणते बघा . बेटा ,मी तुला सर्व डाव शिकवत असताना मला चांगल माहीत होतं की मी नेमकं कुणाला शिकवत आहे . तू जातीन वाघ आहेस . तुझी भूक तू शिकार करून भागविणार . ज्या दिवशी तुला शिकार मिळणार नाही त्यादिवशी तुझी नजर माझ्यावर पडणार . तुला मी कोण आहे , माझे तुझ्यावर उपकार काय आहे , मी तुझी आई आहे . याचे तूला भानही भुकेच्या गोंधळात राहणार नाही कारण त्यावेळी तुझा मुख्य उद्देश भूक भागवणे असणार . त्यात तू सर्व विसरून जाणार आणि एक दिवस तुझी नजर माझ्यावर पडणार म्हणजे पडणार . ज्यावेळी तो दिवस उजाडेल त्यावेळी मला एक पर्याय असावा म्हणून मी तूला सर्व डाव शिकवले पण एक डाव शिकवलं नाही आणि म्हणून मी आज सुरक्षित आहे………….

यातून सांगण्याचा दृष्टिकोण एकच आहे की सर्वच विश्वासपात्र नसतात . जो तो स्वतच्या स्वार्थासाठी आपल्याशी जोडलेला असतो . म्हणून कोणसमोर ही आपले विचार मांडत असताना थोडे विचार करूनच मांडावे . सर्वच जन तुमचसोबत सहानुभूतीने वागतील असे नाही . काय काय असतात विश्वास घातकी मित्र त्यातूनही स्वार्थ साधून आपले हसे करणारे . त्यातूनही आपला बचाव करून त्यांना नामशेष करण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे . कोणालाही जवळ करताना विश्वासाने कधीच जवळ करू नका . आपली आपली धारना ठेवा की कधी ना कधी आपल्याला धोका देणार म्हणजे देणार . अशा पध्दतीने जर तुम्ही वागाल तरच तुम्ही तुमचा बचाव करू शकाल . त्यामुळे कोणत्याही मित्राकडे आपले मन मोकळे करत असताना थोडा विचार करा त्याचा अभ्यास करा मगच आपले मन मोकळे करा . बचाव करणाऱ्या पेक्षा विश्वासतून विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसणारे खूप आहेत या जगात , त्याचा अंदाज घेऊन जगाल तर सुखी राहाल………


by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *