सत्य हे अनुभवावेच लागते..

एक गाव होते . त्या गावामध्ये एक आंधळा स्वत:च्या अंधपणाला अतिशय कंटाळला होता . कोणीही भेटल्यावर तो म्हणायचा .”मला प्रकाश दाखवा ” मला त्याची चव घ्यायची आहे , त्याचा मला स्पर्श हवाहवासा वाटतो आहे . त्याच्या या मागणीला गावातील लोकं कंटाळली होती. कोणालाही त्याचे समाधान करता येईना . एकदा त्या गावात एक साधू आले होते . त्यांच्या कानावर आंधळ्याची हकिगत गेली . ते ऐकून साधू म्हणाले , त्याला कोणीही काय बोलू नका . त्याला आता खरी गरज एखाद्या वैद्यांची आहे . त्यांच्या बोलण्या प्रमाणे त्याला वैदयाकडे नेण्यात आले . त्याच्या डोळ्यातील मोतीबिंदू काढला , आणि त्याला सर्व काही दिसू लागले . आनंदाने तो साधुकडे गेला . साधुने त्याला पाहिले आणि विचारले ,” भल्या माणसा , आता मला प्रकाश , चव आणि स्पर्श ऐकून दाखव . “त्यावर विचार करत तो माणूस म्हणाला , हे अशक्य आहे . हे मी एकवू नाही शकत . त्यावर साधू म्हणाले अरे , आजपर्यंत लोकं तूला हेच सांगत होते . पण तू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता . बोध : सत्य हे अनुभवावेच लागते …….


by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *