गुणधर्म

एक राजा होता . एके दिवशी तो राजा फिरता फिरता एका जंगलात गेला . त्या जंगलांमध्ये त्याला एक झोपडी दिसली व तो तिथे थांबला तिथे एका पिंजऱ्यात एक पोपट होता तो ओरडू लागला , पळा पळा ,पकडा मारून टाका त्याला त्याचा घोडा घ्या , त्यांचे सर्व दागिने काढून घ्या हे ऐकताच राजाला कळले की ही डाकूनची झोपडी आहे आणि राजाने घोडा पळवला त्याच्या मागे एक डाकू घोडा घेऊन त्याच्या मागे पाठलाग करू लागला पण राजाचा घोडा चपळ असल्याने तो काय हाती लागला नाही . डाकू निराश होऊन परतला . राजा पुढे आल्यावर त्याला दुसरी ऋषींची झोपडी दिसली व राजा तिथे थांबला . तिथे थांबल्यांवर तिथेही पोपट होता . तो लगेच बोलू लागला अरे !बाहेर या राजन आले आहेत त्यांचा आदर सत्कार करा , त्यांना पानी द्या . मग ऋषि बाहेर आले त्यांनी राजाना पानी वगैरे दिले . सर्व झाल्यानंतर राजा ऋषिना म्हणाले , महाराज ! एकाच जातीच्या पक्ष्यांच्या स्वभावात इतका फरक कसा काय यावर ऋषि बोलायच्या आधी पोपटच सांगू लागला , आम्ही दोघेही एकाच आई वडिलांची लेकर आहोत पण त्याला त्या डाकूनी नेलं आणि मला ऋषि घेऊन आले . तो तिथे त्या दरोडेखोरांचे हिंसक शब्द ऐकतो आणि मी ऋषींचे शब्द ऐकतो . संगतीमुळे संजीवामध्ये गुण किंवा दोष कसे येतात हे तुम्ही पाहिले असेल . बोध – मुलं जसे जसे मोठे होते तस तसे पालक, आजूबाजूचे वातावरण आणि बालमित्र यांचा त्यांच्या जीवनावर परिणाम होत असतो . म्हणून पालकांनी काळजी घेतली पाहिजे , आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजे .


by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *