शेळी , करडू आणि लांडगा

एक शेळी सकाळी उठून चरण्यासाठी रानात जाण्यास निघाली . त्यावेळी ती आपल्या करडास म्हणाली , बाळा तू आतून खोपटाचे दार लावून घे आणि मी जेव्हा घरी येईल तेव्हा म्हणेल की सगळ्या लांडग्यानचा सत्यानाश होवो ,असे म्हणल्यानंतर तू दरवाजा उघडायचा अन्यथा दरवाजा उघडू नकोस , असे सांगून शेळी चरण्यास निघून गेली .हे सर्व बोलणे एका लांडग्याने आडून ऐकले आणि शेळी गेली कि लगेच येऊन म्हणाला , सगळ्या लांडग्यानचा सत्यानाश होवो . आईने सांगितलेले शब्द ऐकताच करडू दाराजवळ आले परंतु त्याला आवाज आपल्या आईचा नसल्याचे जाणवले व करडू म्हणाले तू माझी आई नाही आहेस . त्यावर लांडगा म्हणाला अरे बाला मी तुझीच आई आहे . त्यावर करडू दरवाजातून बाहेर बघून म्हणाले तू माझी आई आहेस तर तुला दाढी कशी काय नाही . माझ्या आईला तर दाढी आहे . हा प्रश ऐकताच लांडगा ओशाळला आणि निमूटपणे निघून गेला ..

बोध

फसवेगीरी करणाऱ्या मानसासंबंधी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी .


by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *