करावे तसे भरावे

कथा

एका गावात एक चोर रहात असतो . छोट्या मोठ्या चोऱ्या करणं त्याचा व्यवसाय होता. एकदा त्याला दोन तीन दिवस त्याला कुठेही चोरी करायला भेटली नाही . असाच एके दिवशी तो शेजारच्या गावात गेला होता,तिथे त्याला एक मोठा बंगला दिसला बंगल्याच्या बाजूला एक तबेला होता तत्यामध्ये एक घोडा बांधला होता चोराला वाटले आपल्याला इथे कुणी ओळखणार नाही या विचाराने त्याने घोडा सोडला आणि बाहेर आणून लगेच रपेट मारून तेथून निघून गावात आला गावात बाजार भरला होता त्याने तिथे घोडा विकण्यासाठी उभा केला व्यापारी येत होती घोड्याची किमत ठरवत होती . योगायोगाने घोड्याचा मालक तिथे आला . त्याने आपला घोडा ओळखला आणि त्या चोराला जाणवू न देता घोडा घेण्यासाठी बोली करू लागला . घोड्याची किमत ठरली व तो चोराला म्हणाला घोडा कसा आहे हे रपेट मारून बघतो आणि तुम्हाला पैसे देतो , असं म्हणून त्याने रपेट मारण्यासाठी घोडा पळवला . बराच वेळ तो बाजारात फिरकाला नाही . चोराने खुपवेळ वाट पाहिली व नंतर घरी जाण्यासाठी निघाला. घरी जाताना आजूबाजूचे व्यापारी त्याला विचारू लागले कितीला दिला घोडा चोर म्हणाला , जेवढ्याला आणल्याला तेवढ्याला दिला .

बोध

मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला शिकाय मिळते की “करावे तसे भरावे”.


Posted

in

, , ,

by

Tags:

Comments

One response to “करावे तसे भरावे”

  1. Datta shinde Avatar
    Datta shinde

    💯

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *