*विश्वास*

कथा

विश्वास कसा असावा याच उत्तम उदाहरण या कथेतून दिले आहे …

कोण्या एका नगराचा राजा व प्रधान शिकारीसाठी गेले असताना एका वृक्षाखाली विश्रांती घेत होते . त्या ठिकाणी पाण्याचे अतिशय दुभिक्ष होते . त्या ठिकाणी जवळ एक तलाव होता, पण त्यात पाणी नव्हते . राजा क प्रधान तहानेने व्याकुळ झाले असताना त्या वृक्षाखाली विश्रांती घेत होते. त्या वृक्षावर एक पिंगळा व पिंगळी या जोडप्यांचा संवाद सुरू होता . पिंगळा म्हणाला ,या आटलेल्या तलावात पाणी येईल ,पण त्यासाठी या नगरीच्या राजाचे शिर कापून त्यांचे रक्त तलावात शिंपडावे लागेल . तेव्हा ती पिंगल्याची मंदी म्हणाली , अहो ! जर राजाचा मरण पावला तर मग काय उपयोग त्या पाण्याचा ? त्यावर पिंगळा म्हणाला समोरच्या वृक्षावर एक वल्ली आहे , त्या वल्लीच्या रसायने कार्यभाग झाल्यावर राजाचे शिर पुन्हा जोडता येईल . त्या पिंगळा पती-पत्नीचा हा संवाद ऐकताच प्रधान उठला आणि राजाच्या छातीवर बसला राजा तर जागाच होता . तहानेने व्याकूळ असताना झोप थोडीच लागणार आहे . फक्त डोळे अर्धवट झाकले होते . आपला प्रधान आपल्या छातीवर बसला तरीही राजा त्याला काहीच बोलला नाही . प्रधानाने तलवारीने राजाचे शिर कापले व तलावात नेऊन रक्त शिंपडले व पुन्हा वृक्षांवरील वल्लीच्या साहयाने राजाला जीवंत केले . पण तरीही राजा एक शब्द बोलला नाही . एके दिवशी एकांतात असताना प्रधानेने राजाला विचारले मी तुमच्या छातीवर बसलो तेव्हा तुमची मान कापताना मला काहीच विरोध का केला नाही ? तेंव्हा राजा हसतमुखाने म्हणाला , प्रधानजी ! माझा तुझ्या कर्तुत्वावर पूर्ण विश्वास आहे .

विश्वास कसा असावा याच हे उत्तम उदाहरण .

Comments

One response to “*विश्वास*”

  1. Datta shinde Avatar
    Datta shinde

    💯🤞🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *