मैत्री दिवस

मैत्री म्हणजे काय ? ते सोडा ओ ! व्याख्या काय करायच्यात खरतर व्याखेत बसतं ते नातं नसतच कधी . रोज रोज भेटतात , रोज एकमेकांशी बोलतात तेच खरे मित्र मैत्रिणी असतात , असं असतं का ?नाही मैत्रीला जात नसते, मैत्रीला वेळ नसते,मैत्रीला वय नसते आणि हो मैत्रीला रूपही नसतं . प्रेमाच्या कित्येक पुढे गेलेलं नातं म्हणजे मैत्री . समोरच्याचा त्याच्या गुण दोषयासकट स्वीकार करणं म्हणजे मैत्री . आपल्या मित्राला जगाने खूप मान द्यावा अशी अपेक्षा नसते पण त्याचा केलेला अपमान आपल्याला सहन होत नाही तिथे असते मैत्री , मनातील बोलताना समोरच्याला आपण गमावू याची भीती नसते तिथे असते मैत्री , हाताची हातावरील टाळी म्हणजे मैत्री , प्रेमाने केलेली शिवीगाळ म्हणजे मैत्री , टपरीवरची वाटून घेतलेली कटींग म्हणजे मैत्री , जगासाठी अदूरशे पण दोघांच्याही मनात असलेलं नातं जिथे देणंही हक्काच आणि घेणही ते नातं म्हणजे मैत्री. मैत्री म्हणजे असं नातं जिथे समोरच्या च्या मनाची काळजी स्वतपेक्षा जास्त घेणं म्हणजे मैत्री.

मैत्री दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा !


Posted

in

,

by

Tags:

Comments

One response to “मैत्री दिवस”

  1. Datta shinde Avatar
    Datta shinde

    🤞🏻💯
    Life is friend in important…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *