आठवणीतली शाळा

जिने तुम्हाला आम्हाला लिहायला, वाचायला आणि बोलायला शिकवले . जिने उभे केले , पडायला शिकवले आणि वागायलाही शिकवलं होय टी म्हणजे तुमची माझी आणि सर्वांच्या आठवणीतली शाळा . अजूनही मला माझ्या शाळेचा पहिला दिवस आठवतो, तसा तो सर्वानाच आठवतो . नेहमीच्या घरापेक्षा नवे घर , नवा परिसर , नवे मित्र सारेच काही नवेनवे पण शाळेचे दिवसच वाटतात हवेहवे. दिवसामागून दिवस गेले. खूप जण थांबले, रमले, घडले आणि आजही घडत आहेत मीच काय माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी हे शाळेने घडवले आणि भविष्यातही ती घडवतच राहणार आहे . आजही रस्त्याने जात असताना शाळेचा परिसर आणि शाळेचे प्रवेशद्वार आजही जणू बोलते आहे , होय हेच तुझे जीवन आणि असे केंद्र इथेच मिळेल तूला माणूस बनण्याचा मंत्र . शाळा जशी आपल्याला आठवते तसेच शाळेतील शिक्षकही आठवतात . आपल्याला घडवण्यात शिक्षकांचाही खूप मोठा वाटा असतो . जीवन कसे जगावे हे आई-वडील शिकवतात . पण जीवन जगत असताना आलेल्या संकटांना कसे सामोरे जायचे हे शिक्षक शिकवतात मित्रांनो शाळेविषय लिहायच म्हटलं तर पानं अपुरी पडतील .

हे मी शाळेविषयी लिहलेल्या चार शब्दांत काही चूक झाली असेल तर माफी असावी . आणि तुम्हाला आवडले असेल तर प्रतिसाद नक्की द्या आणि तुमचे शाळेविषयी काय मत आहे हे पण जरूर आमच्यापर्यंत पोहचवा ………


Tags:

Comments

One response to “आठवणीतली शाळा”

  1. Datta shinde Avatar
    Datta shinde

    जुनी शाळा म्हणजे खूपच भारी होते ते म्हणजे आपले लहानपण.. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी….💯

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *