पात्रता नसताना चूका काढणं सोपे असते …..

अकबर बादशहाच्या दरबारात एकदा एक चित्रकार आला होता . त्याने एक अतिशय सुंदर चित्र काढून बादशहाला भेट म्हणून दिले . चित्र पाहून बादशहा आणि त्याच्या कुटुंबियाना खूपच आवडले. चित्र ठेऊन घेऊन बादशहा त्या चित्रकाराला आता खूप मोठं बक्षीस ही गोष्ट दरबारातील इतर मंडळीना अजिबात सहन झाली नाही . मग एकेकाने त्या चित्रात दोष दाखवायला सुरुवात केली , आणि हे चित्र चौकामध्ये लावून प्रजेचे मत घ्यायचे सांगितले त्यावर बादशहा म्हणाला मत कसे घ्यायचे मग मंत्र्याने उत्तर दिले . “चित्रात जिथे चूक दिसेल तिथे फुली मारावी . मग चित्र बघणारा प्रत्येक जन चित्रावर फुली मारू लागला . हे पाहून चित्रकाराला खूप वाईट वाटले . मग तो बिरबलांकडे गेले . बिरबलाने त्याला एक सूचना सुचवली , असेच दुसरे चित्र काढा आणि त्याच चौकात ठेवा व खाली लिहा या चित्रामध्ये तुम्हाला जिथे चूक दिसेल ती दुरुस्त करा . दुसऱ्यादिवशी चित्रकार चौकामध्ये गेला व पाहतो तर चित्रावर एकही फुली नव्हती . आणि त्याचे चित्र उत्कृष्ट दर्जाचे आहे हे ही सिद्ध झाले.

बोध

स्वतामध्ये पात्रता नसताना दुसऱ्यांच्या चुका काढणं खूप सोपे असते .


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *