लोभ

एका गावात चोर चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता . फिरता फिरता गावकऱ्यांनी त्याला पकडले आणि एका झाडाला बांधून टाकले . मग गावकरी विचार करू लागले याला शिक्षा काय द्यावी का गावातील मुख्य माणसाला विचारावे ? या विचाराने मग ठरले की मुख्य माणसाला बोलाऊन आणायचे आणि ते सांगतील टी शिक्षा चोराला कारायची . सगळे गावकरी चोराला एकटे झाडाला बांधून मुख्य माणसाला बोलावण्यासाठी गेले . काही वेळ गेल्यानंतर त्या रस्त्याने एक गुराखी जात होता . त्याने त्या चोराला बांधलेलं पाहिलं आणि त्याने त्याला विचारले तू कोण आहेस ? तुला असे कोणी बांधुन ठेवले आहे . तू काय गुन्हा केला आहे का ? चोराने विचार केला ही सुटायची चांगली संधी आहे . चोर म्हणाला ,”अरे काय सांगू मित्रा ! मी आहे एक फकीर !इथे काही चोर आले होते . लोकांची लूट करून ते धन मिळवतात आणि त्याचे पाप लागायला नको म्हणून त्यातील काही धन ते दान करतात गेल्या अनेक दिवसापासून त्यांना कुणी फकीर दानासाठी गाठ पडला नव्हता . ते धन घ्या म्हणत होते पण कुणी त्यांचे धन घेत नव्हते. अशातच त्यांना मला दान द्यावे असे वाटले पण मी नकार देताच त्यांनी मला मारहाण केली व झाडाला बांधून ठेवले व ते परत येऊन मला धन दान करूनच पुढे जाणार आहेत . “हे ऐकताच गुरख्याच्या मनात लोभ निर्माण झाला . तो त्या चोराला म्हणाला “भाऊ तू फकीर तुला धनाचा काय फायदा ? तू ते घेणारही नाहीस त्यापेक्षा आता अंधाराची वेळ झाली आहे . तू त्याचा फायदा घे आणि पळून जा तुझ्या जागेवर मला बांधून ठेव अंधार असल्यामुळे ते तू आहे असं समजून मला धन देतील आणि माझी गरीबी दूर होईल . चोराने आपल्या जागी गुराख्याला बांधून पळून गेला . तिकडे गावकरी मुख्य माणसाकडून चोराला समुद्रात फेकण्याचा आदेश घेऊन आले . त्यांनी चोराची शहानिशा न करता व अंधार असल्यामुळे चेहरासुद्धा न बघता त्याला समुद्रात फेकून दिले . अशा तऱ्हेने धन लोभाने एका गरिबाचा जीव गेला .

तात्पर्य :

कोणत्याही गोष्टीचा लोभ चांगला नाही , लोभामुळे आत्मघात होण्याची शक्यता असते . त्यापासून दूर राहणे हेच बरे .


Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *