योग्य दिशा निवडा

एकदा पुणे स्टेशनवर एक युवक उतरला . व तिथे असलेल्या रिक्षावाल्याला म्हणाला मला गणपती मंदिरात जायचे आहे ….. त्यावर रिक्षावाला म्हणाला 200 रुपये लागतील , त्यावर तो युवक म्हणाला नको माझे मी चालत जातो . असे म्हणून तो आपले समान घेवून खूप दूरपर्यंत चालत राहीला . काही वेळाने तोच रिक्षावाला पाठीमागून आला . त्या युवकाने त्याला थांबवले व म्हणाला आता तर मी अर्ध्यापेक्षा जास्त रास्ता पार केलाय त्यावर रिक्षावाला म्हणाला 400 रुपये त्यावर तो युवक म्हणाला , आधी तर तुम्ही 200 रुपये घेत होता आणि आता 400 रुपये कसे काय ? त्यावर रिक्षावाला म्हणाला गणपती मंदिर पाठीमागे राहिले आहे . खूप वेळ झाले तुम्ही मंदिराच्या विरुद्ध दिशेने चालले आहात . त्यावर रिक्षावाला काहीही न बोलता गपपणे रिक्षात बसला .

मित्रांनो जीवनात आपण कोणतेही काम करण्याच्या आधी काहीही विचार न करता निर्णय घेतो आणि ते काम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करतो आणि खूप वेळही वाया घालवतो आणि ते काम अर्ध्यावरच सोडून देतो . तर मित्रांनो जर दिशा योग्य असेल तर मेहनत सफल होते नाहीतर कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही . म्हणून योग्य दिशा निवडा आणि मेहनत करत रहा यश तुमच्या हातात असेल ….


by

Tags:

Comments

One response to “योग्य दिशा निवडा”

  1. Datta shinde Avatar
    Datta shinde

    Right side 🤞🏻💯

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *