बंद घराचे आत्मवृत्त

मित्रांनो या छोट्याश्या लेखातून बंद घराचे आत्मवृत्त लिहण्याचा प्रयत्न केला आहे . आवडला तर नक्की शेअर करा .

राहत्या घराला चार-आठ दिवसांसाठी कुलूप लावून जाताना , जरा जीवावरच येतं ना ! एक हुर हुर वाटते बंद दाराकडे बघून , निरोप देताना मनातल्या मनात आपणच घराला सांगतो , येतो परत आठ दिवसानी तोवर सांबलरे बाबा ! तेव्हा घरी उदासल्यासारखे भासतं . कधी कधी असं होतं की आपण जारी आठ दिवस म्हणून असलो तरी तरी काही कामानिमित्त दोन चार दिवस वाढून जातात. आणि मग घरी परतल्यावर आपल्या घराच्या दारवाज्यासमोर उभे राहिल्यावर तेव्हाचा जो सुकून असतो ना तो काही वेगळाच असतो . पण पण काही वेळा वाट पाहून घर मात्र रूसलेलं असतं . दायर उघडल्यावर घरचा हिरमुसलेपणा जागोजागी दिसतो . जाताना आपण घाईगडबडीत बदलेली कपडे सोफ्यावर , खर्चीवर तसेच आळश्यासारखे गपचीप पडून असतात तेव्हा गडबडीत विसळलेल्या कपबशी तश्याच ओट्यावर निपचित असतात . पोरांची वह्यापुस्तके कोपऱ्यात तसेच टेबलावर हात पाय पसरून बसलेली असतात . कपाटाच्या आरश्यात स्वता:चा आळशीपणा बघू वाटणार नाही अशी धूळ बसलेली असते . रोजची फरशी डोळ्यांनी आणि पायांना जरा वेगळीच भासते . किचनमधील काही भांडी जाळित मान टाकून बसलेली असतात . फ्रीज उघडल्यावर त्यात उरल्या सुरलेल्या भाज्या ,फळे , लोणचे इत्यादी सगळेजण डोळे वटारून आपल्याकडे बघत असतात . आपण गेल्यावर जागेसाठी यांच्यामध्ये सुद्धा युद्ध झालेले असतं , त्या युद्धात टोमॅटो , कोथिंबीर , कडीपता शहीद झालेला असतो . बेडरूममध्ये गेल्यानंतर वाट पाहून घराच्या छताचा जीव टांगलेल्या फॅनसारखा टांगणीला लागलेला असतो . आता सांगा बर घर का रूसणार नाही ?

रूसलेल्या घराला मग टी आवरायला घेते . इतके दिवस अंधार पांघरून बसलेल्या खिडक्यांचे पडदे सरकण दूर होतात , आणि श्वास कोंडलेल्या घराला ताज्या हवेच्या झुळकीनं हायसं वाटते . दोन तीन तासात सारं काही जाग्यावर पोहचतं . ती भरभर तिच्या त्या लाडक्या घराला देखण करते . तर अशा आवरलेल्या घराला मग हातात चहा घेऊन थोडी दमलेली ती दमलेली ती समाधानाने न्याहाळत दोन घटका बसते , तेव्हा लाडात आलेलं घर तिच्याकडे बघून खुदकण हसतं तिलाही मनात वाटतं , कोणाची दृष्ट न लागो .

शेवटी बाई घराचीही आईच असते !


by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *