फार पूर्वीची गोष्ट आहे . एक माणूस होता जो अत्यंत आळशी आणि गरीब होता . त्याला कोणतेही कष्ट करायचे नव्हते , पण तो श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहत असे . तो भीक मागून जगत असे . एके दिवशी सकाळी त्याला भिक्षा म्हणून दुधाने भरलेली घागर मिळाली तो खूप खुश झाला . आणि दुधाने भरलेली घागर घेऊन घरी आला . त्याने ते दूध उकळले थोडे प्याला आणि उरलेले दूध एका भांड्यात ओतून ठेवले . दुधाचे दहयात रूपांतर करण्यासाठी त्यात थोडे विरजण टाकले . त्यानंतर तो झोपायला आडवा झाला . झोपताना तो विचार करू लागला .

त्याला वाटले सकाळ दुधाचे दही होईल . दही मंथन करून लोणी मिळवेन , ते लोणी गरम करून मग मी तूप तयार करेन . ते तूप मी बाजारात विकेन आणि काही पैसे मिळवेन. त्या पैशातून मी कोंबडी खरेदी करेन मग ती कोंबडी अंडी घालेल मग त्या अंड्यातून अनेक कोंबड्या जन्माला येतील मग त्या शेकडो अंडी घालतील . आणि लवकरच माझा पोल्ट्री फार्म असेल . या कल्पनेत तो मग्न होता . मग त्याने विचार केला , मी त्या सर्व कोंबड्या विकेन आणि मग गाई म्हशी विकत घेईन आणि दुधाची डेअरी उघडेन . शहरातील सर्व माझ्याकडून दूध घेण्यासाठी येतील आणि मी लवकरच श्रीमंत होईल . मग मी एका श्रीमंत मुलीशी लग्न करेन . मग


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *