स्वप्न आणि वास्तव

कथा

फार पूर्वीची गोष्ट आहे . एक माणूस होता जो अत्यंत आळशी आणि गरीब होता . त्याला कोणतेही कष्ट करायचे नव्हते , पण तो श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहत असे . तो भीक मागून जगत असे . एके दिवशी सकाळी त्याला भिक्षा म्हणून दुधाने भरलेली घागर मिळाली तो खूप खुश झाला . आणि दुधाने भरलेली घागर घेऊन घरी आला . त्याने ते दूध उकळले थोडे प्याला आणि उरलेले दूध एका भांड्यात ओतून ठेवले . दुधाचे दहयात रूपांतर करण्यासाठी त्यात थोडे विरजण टाकले . त्यानंतर तो झोपायला आडवा झाला . झोपताना तो विचार करू लागला .

त्याला वाटले सकाळ दुधाचे दही होईल . दही मंथन करून लोणी मिळवेन , ते लोणी गरम करून मग मी तूप तयार करेन . ते तूप मी बाजारात विकेन आणि काही पैसे मिळवेन. त्या पैशातून मी कोंबडी खरेदी करेन मग ती कोंबडी अंडी घालेल मग त्या अंड्यातून अनेक कोंबड्या जन्माला येतील मग त्या शेकडो अंडी घालतील . आणि लवकरच माझा पोल्ट्री फार्म असेल . या कल्पनेत तो मग्न होता . मग त्याने विचार केला , मी त्या सर्व कोंबड्या विकेन आणि मग गाई म्हशी विकत घेईन आणि दुधाची डेअरी उघडेन . शहरातील सर्व माझ्याकडून दूध घेण्यासाठी येतील आणि मी लवकरच श्रीमंत होईल . मग मी एका श्रीमंत मुलीशी लग्न करेन . मग मला एक सुंदर मुलगा होईल . जर त्याने काही खोडसाळपणा केला तर मला खूप राग येईल आणि मी त्याला धडा शिकवण्यासाठी मी त्याला काठीने अशी मारहाण करेन . असा विचार करून त्याने पलंगाच्या बाजूला पडलेली काठी उचलली आणि मारण्याचे नाटक करू लागला , टी काठी त्याच्या दुधाच्या घागरीवर लागली आणि दुधाचे भांडे फुटले . त्यामुळे सर्व दूध जमिनीवर पसरले . भांड्याचा आवाज ऐकून त्या माणसाची झोप उडाली . सांडलेले दूध पाहून त्याने डोके धरले .

म्हणून स्वप्न बघा , पण नुसते स्वप्न बघून काही होणार नाही आणि मिळणार नाही . आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतात जीवनात कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही . आपले जीवन सर्वोत्तम बनवण्यासाठी कठोर परिश्रम करावेच लागतील . कारण मेहणतीला पर्याय नाही .

जर तुम्ही फक्त स्वप्न पाहत राहिला आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणतेच पाऊल उचलले नाही , तर तुम्ही असे करून स्वतची फसवणूक करत आहात , स्वताला धोका देत आहात म्हणूनच प्रथम तुमची 100% मेहनत द्या , मग यश स्वताच तुमच्याकडे चालत येईल.

Comments

One response to “स्वप्न आणि वास्तव”

  1. Datta shinde Avatar
    Datta shinde

    Nice story 💯

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *