*सुंदर संदेश *

एका इमारतीचे बांधकाम चालू होते . अकराव्या मजल्यावर इंजिनियर होता . खाली कामगार काम करत होता . इंजिनियरला त्या कामगाराला काहीतरी सांगायचे होते . परंतु त्याचा आवाज कामगारापर्यंत पोहचट नव्हता . आता काय करायचे , त्या कामगाराला सूचना कशा करायच्या यांचा विचार इंजिनियर करत होता . इंजिनियर आपल्या खिशात हात घालतो आणि एक रुपयाच नाणं खाली फेकतो त्याला वाटते ते पडलेले नाणे पाहून कामगार वर पाहिल पण तसं काही झालं नाही . कामगार ते पडलेले नाणे उचलतो आणि खिशात घालतो व आपले काम करत राहतो . इंजिनियर परत इकडे तिकडे बघतो आणि पुन्हा 5 रुपयाच नाणं खाली टाकतो , त्याला वाटते आता तरी कामगार वर पाहिल पण कामगार वर काय पाहत नाही . परत कामगार ते 5 रुपयाच नाणं खिशात घालतो आणि आपलं काम सुरू ठेवतो . आता इंजिनियर कामगाराच्या दिशेने एक खडा टाकतो . आता मात्र खडा कोणी टाकला हे पाहण्यासाठी कामगार वर पाहतो .

मित्रांनो असेच काही माणसांचे झाले आहे . देव त्यांना नोकरी देतो पैसा देतो तरी त्यांच लक्ष देवाकडे जात नाही . मग देव त्यांना प्रमोशन देतो अधिक पैसा देतो . तरीसुद्धा त्यांच लक्ष देवाकडे जात नाही मग देव त्यांच्या त्यांच्या जीवनात एखादा संकटाचा खडा टाकतो . मग मात्र त्यांच लक्ष देवाकडे जात आणि ते देवाला हात जोडतात , म्हणून जर योगयवेळी देवाकडे जर देवाकडे हात जोडले ना तर देव आपल्या आयुष्यात कधीच संकटाचा खडा टाकणार नाही


by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *