आयुष्य

प्रेरणादायी लेख

आयुष्य हे रेल्वेच्या प्रवासासारख असतं . रेल्वेत कसे खूप सारे प्रवाशी असतात , तसचं आयुष्याच असतं . आपण आपल्या स्टेशनवरून रेल्वेत चढतो , कधी कुणाला सोबत घेऊन तर कधी एकटे . रेल्वे पुढे धावायला लागते . रिझरवेशन केलेली लोकं सुखाने एका जागेवर बसून नजारे बघत असतात . इतरांची मात्र उभे राहण्यासाठीची धडपड सुरू असते . काही वेळाने चार ओळखी होतात , गप्पा रंगतात , सुख दुख वाटले जाता . नंतर मात्र आपापलं ठिकाण आलं की एकेक जन उतरून जातो ,रेल्वेतल्या आठवणी सोबत घेऊन . आपल्यासोबतचे देखील असेच कुठेतरी उतरतात आपण मात्र एकटे पडतो . पण शेवटी आपलाही मुक्काम येतोच आणि आपणही इतरांसारख निघून जातो मागे सगळ सोडून ..!

तसचं आयुष्याचं असतं . आयुष्याला सुरुवात होते पैसा असेल तर सुखाचं जीवन सुरू होतं , नाहीतर जगण्यासाठीची धडपड आणि जीवंत राहण्याचा प्रयत्न . नंतर आयुष्यात काही लोकं येतात . सुख दुख येतात . पण अचानक काही काळाने सोबत असणारे लोकं दुरावतात खूप साऱ्या आठवणी देऊन ते निघून जातात . आपण मात्र एकटे पडतो . एकेक जन कसा आपल्याला एकट करून जातोय ते बघत . पण शेवटी आपलीही वेळ संपते आणि आपणही सारं काही मागे सोडतो , केवळ आठवणीच्या बोचक्यानिशी निघतो , एका अज्ञात प्रवासाला ..!

जग आणि रेल्वे मात्र निरंतर चालू राहतात फक्त नवीन प्रवाश्यांसाह …….


Tags:

Comments

One response to “आयुष्य”

  1. Datta shinde Avatar
    Datta shinde

    💯🤞🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *