असं असतं जीवन

जीवन हे असचं असतं ..

जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत जाण येणं असतं . जोपर्यंत आपण स्वताहून बोलत असतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मिळत असतो . जेव्हा देणं आणि स्वता विचारण संपत तेव्हा नात्याचा आपोआप मृत्यू होतो . आपण कोणासाठी कधीच महत्वाचे नसतो , महत्वाची असते टी समोरच्याची गरज . प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी लोकं नात्याला जास्त किंमत दीत नाहीत . तुमचे दिवस जर चांगले असतील तर आमंत्रण नसताना देखील गाव गोळा होतो, पण वेळ खराब असेल ना तर निरोप देऊनही कानाडोळा केला जातो . माणूस नेहमीच चुकीच्या समजुतीत जगत असतो की आपण लोकांसाठी खास आहोत . परंतु सत्यता पडताळून पाहिली तर समजेल..

आपल्या असण्यान किंवा नसण्यान काहीच फरक पडत नाही ज्याची जेव्हढी गरज तेवढीच त्याची किंमत असते . पाठीवरच्या ऑझ्यापेक्षा मनावरच ओझ केव्हाही जड असतं ते हलक करण्यासाठी झेलणारा देखील तितकाच आपलांसा असावा लागतो.


by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *