सुरक्षितता

एकदा एका हरणाचा एक डोळा निकामी झाला . मग त्याला युक्ति सुचली . त्याने समुद्राच्या काठी फिरायला सुरवात केली . त्याला वाटले आपल्याला धोका आहे तो जमीनिवरूनच कारण कोणताच शिकारी समुद्रातून येणार नाही . एक डोळा जमिनीकडे लाऊन आपल्याला अन्नाची सोय करता येईल .

एक शिकारी बरेच दिवस त्या हरणावर डोळा ठेऊन होता . बरेच दिवस तो त्याला मारण्यासाठी टपुन होता ,पण ते हरिण काही त्याच्या तावडीत सापडत नव्हते . त्याची शिकार काही त्याला होत नव्हती . जमिनीवरून जेव्हा शिकारीची वेळ ये तेव्हा हरिण पळून जात असे .

मग त्याला एक कल्पना सुचली. त्याने एक होडी घेतली व समुद्रामध्ये सकाळपासून फिरत राहिला. अचानक संध्याकाळच्या वेळी त्याने हरणावर गोळी झाडली . नेम अचूक लागला . हरणाला गोळी लागल्यावर हरिण जमिनीवर कोसळले . मरता मरता ते स्वताला म्हणाले ज्या डोळ्याने मला डोळ्याने मला दिसत नव्हते तोच डोळा मी समुद्राकडे ठेऊन फिरत राहिलो . पण समुद्राच्या बाजूनेच माझा घात झाला. मला समुद्राच्या बाजूची खात्री होती पण त्या बाजूनेच मला मरणाच्या दारात पोहचवले .

तर मित्रांनो आपल्याला जेथून सुरक्षितता वाटते तिथूनच काही वेळा धोका होऊ शकतो त्यामुळे आपण सुरक्षितता आणि सावधानता बाळगली पाहिजे.


by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *