आकाशवानी

नदीच्या किनाऱ्यावरील एका झाडावर एक माकड त्याच्या मैत्रीण माकडीनीसह बसले होते. अचानक आकाशवाणी सुरू झाली. जो कोणी आकाशवाणी संपल्या संपल्या ह्या नदीच्या पाण्यात उडी मारेल तो राजकुमार किंवा राजकुमारी बनून बाहेर येईल. आकाशवाणी सुरूच असते माकड आणि माकडीन ऐकत असतात. मनात विचारांचे थैमान सुरू असते. काय करू काय करू ? दोघे विचार करत असतात. आकाशवाणी संपते तेवढ्यात माकडीन नदीच्या पाण्यात उडी मारते.

माकड ओरडते वेडी झालीस का? असं कुठं असतं का ? आकाशवाणी खोटी ठरली तर.. तेवढ्यात पलीकडून माकडीन एक सुंदर राजकुमारी बनून बाहेर येते. ती माकडाला म्हणते अरे माकडा, आकाशवाणी जरी खोटी ठरली असती तरी मी पाण्यातून बाहेर येऊन माकडीनच राहिले असते; पण एक संधी घेतल्यामुळे मी आज राजकुमारी झाली आहे. संधी असून फक्त विचारच करत बसल्यामुळे आज तू माकडच राहिला आहेस. संधी दररोज मिळत नाही, तू संधी ओळखू न शकल्यामुळे, शंका घेत बसल्यामुळे आणणी अतिविचारी स्वभावामुळे माकडच राहिलास.

बोध :-

मित्रांनो मनातील विचार हा आकाशवाणी सारखाच असतो. जीवनात आपणही आलेली प्रत्येक संधी साधून संधीच सोनं करा अन्यथा माकडाप्रमाने विचार करीत फांदीवरच माकड बनून राहावे लागेल.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *