निरुपयोगी मित्र

एक ससा जंगलात राहत होता. त्याचे अनेक मित्र होते . त्याला त्याच्या मित्रांचा अभिमान होता. एके दिवशी त्या सस्याने जंगली कुत्र्यांचे भुंकणे ऐकले. आणि तो खूप घाबरला त्याने त्याच्या मित्रांना मदत मागायचे ठरवले. तो पटकन आपल्या मित्र हरणाकडे गेला आणि त्याला म्हणाला, मित्रा काही जंगली कुत्री माझा पाठलाग करत आहेत. तू तुझ्या तीक्ष्ण शिंगाने त्यांचा पाठलाग करू शकतोस का? हरिण म्हणते हो मी करू शकतो पण सध्या मी व्यस्त आहे तू अस्वलाला मदत का नाही मागत?

ससा अस्वलाकडे जाते माझ्या प्रिय मित्रा तू खूप मजबूत आहेस, कृपया मला मदत कर काही जंगली कुत्री माझ्या मागे लागले आहेत तू त्यांना हाकलून लाव अस्वलाने उत्तर दिले मला मला माफ कर आता मला भूक लागली आहे आणि थकवा आला आहे, तू असं कर माकडांची मदत घे. तो ससा माकड, हत्ती , बकरी आणि त्याच्या सर्व मित्रांकडे गेला पण त्याला कोणीही मदत केली नाही. सशाला खूप वाईट वाटले की कोणीही आपल्याला मदत करायला तयार नाही. त्याला समजले की आपल्याला स्वत:न मार्ग काढावा लागेल. तो एका झुडपात लपला, तो खूप शांत पडून राहिला. जंगली कुत्र्यांना ससा सापडला नाही. ते इतर प्राण्यांचा पाठलाग करीत निघून गेली. तो ससा या घटनेतून शिकला की त्याला त्याच्या मित्रांवर अवलंबून न राहता एकटे राहायला शिकावे लागेल.

बोध :-

मित्रांनो म्हणून इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतावर अवलंबून राहणे आणि स्वतावर विश्वास असणे केंव्हाही चांगले .


Tags:

Comments

One response to “निरुपयोगी मित्र”

  1. Datta shinde Avatar
    Datta shinde

    💯

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *