मेहनत करा

एक साधू आणि त्याचा शिष्य एका गावातून चालले होते. जात असताना त्यांना भूक लागते जवळच त्यांना एक झोपडी दिसली ते दोघेही तिथे गेले. त्या झोपडीत एक गरीब पती पत्नी राहत होते. ते साधूनचा आदर सत्कार करतात आणि त्यांना जेवण करायला सांगतात जेवण झाल्यानंतर साधू त्या व्यक्तीच्या घरासमोर असणारी एवढी सारी जमीन कोणाची आहे असे विचारतात तो व्यक्ति म्हणतो माझीच आहे. साधू म्हणतो तुम्ही तुमचे घर कसे चालवता तो म्हणतो माझ्याकडे एक गाय आहे तिचे दूध विकून मिळणाऱ्या पैश्यांत मी माझे घर चालवतो. साधू विचार करतो की आपण आज इथेच मुक्काम करू . ते त्या दिवशी तिथेच राहतात. साधू रात्री 12 1 च्या दरम्यान उठतात आणि आपल्या शिष्याला पण उठवतात आणि त्या शेतकऱ्यांची गाय घेऊन तेथून निघून जातात. शिष्याला कळत नाही की गुरुजींनी असे का केले. तो शिष्य काही वर्षाने त्या शेतकऱ्याच्या तिथे जातो तर तिथे असणारि जमीन फळांची बाग बनली होती. आणि तिथे असणाऱ्या झोपडीच्या जागी आलीशान बंगला झाला होता. तो शिष्य त्या शेतकऱ्याला विचारतात तुम्ही हे कसे केले तो शेतकरी म्हणतो तुम्ही ज्या रात्री इथून गेला माझी गाय पण त्या रात्री निघून गेली. मी थोडेफार पैसे कमवून माझ्या शेतात फळांची झाडे लावली त्यामुळेच आज मी इतका श्रीमंत आहे . जर तेव्हा माझी गाय गेली नसती तर मला माझी क्षमता कळली नसती .

बोध :-

मित्रांनो तुम्हाला जर तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील तर तुम्हाला Comfertzone सोडवा लागेल आणि मेहनत करावी लागेल.


Tags:

Comments

One response to “मेहनत करा”

  1. Datta shinde Avatar
    Datta shinde

    … very nice story 🤞🏻💯

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *