गवळणीचे शिक्षण

एकदा एक गवळण दूध विकत होती आणि दुधाचे मोजमाप करून सर्वांना दूध देत होती. त्याचवेळी एक तरुण दूध घेण्यासाठी आला असता गवळणीने त्याच्या भांड्यात न मोजता दूध दूध भरले. थोड्या अंतरावर एक संन्यासी हातात जपमाळ घेऊन मणी मोजत होते. तेवढ्यात त्यांची नजर गवळणीवर पडली आणि त्याने हा सर्व प्रकार पाहिला आणि जवळ बसलेल्या व्यक्तीला हा सगळा प्रकार सांगितला आणि त्याचे कारण कारण विचारले. त्या व्यक्तीने सांगितले की ज्या तरुणाला त्या गवळणीने माप न करता दूध दिले त्या तरूणांवर ती गवळण प्रेम करते, त्यामुळे तिने त्या तरुणाला न मोजता दूध दिले. ही गोष्ट ऋषींच्या काळजाला भिडली आणि त्यांना वाटले की दूध विकणारी गवळण आपल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा हिशोब ठेवत नाही, आणि ज्या देवावर प्रेम करतो त्याच्यासाठी मी सकाळपासून मणी मोजत बसतो. ही गवळण माझ्यापेक्षा चांगली आहे आणि त्याने माळ काढून फेकून दिली.

बोध :-

आयुष्यही असच असत. जिथे प्रेम असतं तिथे हिशोब नसतो आणि जिथे हिशोब असतो तिथे प्रेम नसते फक्त व्यवहार असतो .


by

Tags:

Comments

2 responses to “गवळणीचे शिक्षण”

  1. Datta shinde Avatar
    Datta shinde

    💯

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *