किंमत वेळेची की अनुभवाची

एका मोठ्या जहाजाचे इंजिन बिघडले होते. लाख प्रयत्न करूनही एकही इंजिनियर ते दुरुस्त करू शकला नाही. मग या प्रकारच्या कामाचा 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या मेकॅनिकल इंजिनियरचे नाव कोणीतरी सुचवले आणि त्याला बोलवण्यात आले. इंजिनियर तिथे आला आणि वरपासून खालीपर्यंत इंजिनची काळजीपूर्वक तपासणी केली. सर्व काही पाहिल्यानंतर इंजिनियरणे आपली बॅग काढली आणि त्यातून रक छोटा हातोडा काढला. मग त्याने हळुवारपणे इंजिनवर हातोडा मारला आणि आता इंजिन सुरू करून बघा आणि इंजिन सुरू झाले. सर्वांना आश्चर्य वाटले जहाजाच्या मालकाने इंजिनियरला इंजिन दुरुस्तीचे पैसे विचारले तेव्हा इंजिनियर म्हणाला वीस हजार रुपये , काय ! मालक हदरला तू जवळपास काहीच केले नाहीस. माझ्या माणसांनी मला सांगितले की तू फक्त इंजिनवर हातोड्याने थोडेसे टॅप केलेस. एवढ्या छोट्या कामाचे इतके पैसे? तुम्ही आम्हाला तपशीलवार बिल द्या. इंजिनियरणे बिल तयार करून दिले. त्यात लिहले होते .

पाहणी केलेले – 10 रुपये

कुठे आणि किती ठोकायचे – 19,990 रुपये

मग इंजिनियर म्हणाला जरी मी हे काम तीस मिनिटांत केले असले तरी ते काम तीस मिनिटांत कसे करायचे हे शिकायला मी तीस वर्षे घालवली आहेत मी तुम्हाला तीस मिनिटे दिली नाहीत, तर त्या वेळेत माझा तीस वर्षांचा अनुभव दिला आहे. पैसे किती वेळ लागला याची नाही, तर ती माझ्या अनुभवाची आहे. जहाजाच्या मालकाला खूप लाज वाटली .

बोध :-

मित्रांनो म्हणून एखाद्याच्या कौशल्याची प्रशंसा करा कारण हे त्यांच्या वर्षांच्या संघर्षाचे, कष्टाचे आणि अश्रुंचे परिणाम आहेत.


Posted

in

by

Tags:

Comments

One response to “किंमत वेळेची की अनुभवाची”

  1. Datta shinde Avatar
    Datta shinde

    ….💯

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *