मूल्यहीन अहंकार

एक राजा होता. त्याच्या राज्यात एक सत्पुरुष आले. राजाने त्यांच्या पायावर डोके ठेवले. राज्याच्या वजीराला हे आवडले नाही. आपल्या राजाने एका सामान्य माणसाच्या पायावर डोके ठेवावे, हे त्याला पटले नाही. तो माणूस गेल्यावर वजीर राजाला म्हणाला , मला के तुमचे हे आवडले नाही. तुमच्यासारख्या किर्तीवंत राज्याची कोणीही बरोबरी करू शकत नाही, मग तुम्ही सामान्य माणसांपुढे का झुकावे? राजा हसला आणि गप राहिला. दोन महिने उलटुन गेल्यावर त्यांनी त्या वजीराला सांगितले की तूला एक काम करावे लागेल. वजीराला काही वस्तु देत राजा म्हणाला तू हे सामान घेऊन गावात विका. सामान विचित्र होते. त्यात बकरीचे डोके, गाईचे डोके, माणसाचे डोके,अश्या अनेक प्राण्यांची डोके होती .

तो वजीर विकायला गेला, त्याने बकरीचे डोके विकले, गायीचेही डोके विकले आणि इतर सर्व प्राण्यांची डोके विकली, मात्र माणसाचे डोके विकले नाही. ते घ्यायला कोणीही तयार नव्हते. या डोक्याचे काय करणार? ही कवठी कोण ठेवणार? तो परत आला आणि राजाला म्हणाला, महाराज सर्व डोकी विकली पण माणसाचे डोके कोणीच घेतले नाही. राजाने ते फुकट द्यायला सांगितले, तो वजीर परत गेला आणि अनेकांच्या घरी गेला आणि फुकट घ्या असे सांगू लागला. लोकं म्हणाली तू वेडा आहेस का? आणि तो परत आला आणि राजाला म्हणाला, महाराज हे डोकं फुकटही कोण घेत नाही.

राजा म्हणाला, आता मी तुला विचारतो की मी मेलो आणि तू बाजारात माझे डोके विकायला गेलास तर काय कोण माझे डोकं घेईल, तो वजीर जरा घाबरला व म्हणाला नाही आपले डोके कोणीही घेणार नाही. माणसाच्या डोक्याला किंमत नसते हे मला पहिल्यांदा कळले. राजा म्हणाला की, मग हे फुकटचे डोके मी सत्पुरुषांच्या पायावर ठेवले तर तू इतका अस्वस्थ का झालास? माणसाच्या डोक्याला किंमत नाही म्हणजेच माणसाच्या अहंकाराला किंमत नाही. माणसाचे डोके अहंकाराचे प्रतीक आहे.

सत्पुरुषांच्या पायी झुकले,तर अहंकार कमी होतो, तसे नाही केले तर अहंकार वाढत जाऊन माणूस भ्रमात जगतो त्याचा अहंकार त्याला रसातळाला नेतो, म्हणून माणसाने नेहमी नम्र राहावे.


by

Tags:

Comments

One response to “मूल्यहीन अहंकार”

  1. Datta shinde Avatar
    Datta shinde

    Nice story 💯🤞🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *