आरोग्य हेच सर्वात मोठं भांडवल

कथा

एकेकाळी एका गावात एक श्रीमंत माणूस राहत होता. त्याच्याकडे पैश्यांची कमतरता नव्हती पण तो खूप आळशी होता. तो आपली सर्व कामे नोकरांच्या मदतीने करत होता. आणि स्वता: दिवसभर झोपत असे, त्याला वाटत असे की मी सर्वांचा स्वामी आहे. कारण माझ्याकडे खूप पैसा आहे. मी काहीही विकत घेऊ शकतो. असा विचार करून तो दिवसभर झोपायचा, पण वाईट विचारांचा वाईट परिणाम होतात असे म्हणतात.

त्या व्यक्तीचे तसेच झाले, काही दिवसानंतर त्याला असे वाटू लागले की त्याचे शरीर पूर्वीपेक्षा सैल होत आहे. त्याला हात पाय हलवायला त्रास होऊ लागला. हे पाहून तो व्यक्ति खूपच अस्वस्थ झाला. त्याच्याकडे खूप पैसा असल्याने त्याने शहरातून मोठमोठे डॉक्टर बोलावले आणि खूप पैसा खर्च केला. पण त्याचे शरीर काही बरे होऊ शकले नाही. तो खूप दुखी होऊ लागला.

एकदा एक साधू त्याच्या गावातून जात असताना त्यांनी त्या व्यक्तीच्या आजाराविषयी ऐकले. साधुने त्या व्यक्तीच्या नोकराला सांगितले की मी तुमच्या सेठचा आजार बरं करू शकतो, हे ऐकून नोकर सेठकडे गेला आणि साधूबद्दल सर्वकाही सांगितले. लगेच सेठणे साधूला त्याच्या घरी बोलवायला सांगितले, पण साधू म्हणाला की मी येणार नाही. जर सेठला बरे व्हायचे असेल तर त्याने स्वता: माझ्याकडे यावे. सेठ खूप अस्वस्थ झाले, कारण तो असाहाय्य होता त्याला कसे चालायचे हे माहीत नव्हते तेव्हा मोठ्या कष्टाने त्याने हिम्मत एकवटली आणि साधूला भेटायला गेला. तेव्हा साधू तिथे नव्हते. दुखी मनाने सेठ परत आला. आता हा त्याचा रोजचा नियम झाला.

साधू त्याला दररोज फोन करून बोलावत असे पण आणि सेठ आला की त्याला भेटत नसे. हे करताना 3 महीने गेले. आता सेठला मी बरा होतोय आणि हातपाय देखील हळूहळू दुखायचे कमी झाले. साधू रोज का भेटत नव्हते हे त्याला आता समजले. तीन महीने सतत चालल्यानंतर त्याचे शरीर बरे झाले होते. तेव्हा त्याला सांगितले की तू आयुष्यात पैसा कितीही कमावला तरी निरोगी शरीरपेक्षा मोठी संपत्ती नाही.

तर मित्रांनो हीच गोष्ट आपल्या दैनदीन जीवनातही लागू होते. तुम्ही कितीही पैसे कमावले तरी निरोगी शरीरापेक्षा मोठे भांडवल नाही.


by

Tags:

Comments

One response to “आरोग्य हेच सर्वात मोठं भांडवल”

  1. Datta shinde Avatar
    Datta shinde

    ..💯

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *