खरा वेडा कोणं

एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्हणजेच पूर्ण बरा झाला आहे का नाही हे पाहण्यासाठी अनेक चाचण्यांना तोंड द्यावे लागत असे. त्यातील शेवटच्या चाचणीमध्ये वेड्यांसामोर एक कोरे चकचकीत पाच रुपयाचे नाणे आणि एक मळकट पन्नास रुपयांची नोट ठेवली जाई. त्यातील फक्त एकच गोष्ट त्याला उचलण्यास सांगितली जाई . वेड्याने जर पन्नास रुपयाची नोट उचलली तर त्याला डिस्चार्ज दिला जाईल आणि पाच रुपयांची नोट उचलली तर त्याला परत सर्व चाचण्या पार कराव्या लागत . गरज पडल्यास पुन्हा हॉस्पिटलमध्येही पाटवले जात . हॉस्पिटल मधील एक वेडा शेवटच्या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्या पटापट पार करत असे मात्र शेवटच्या चाचणीला नापास होत असे अनेकदा असे घडल्यावर चाचणी घेणारे डॉक्टर कंटाळले व त्यांनी एक युक्ति केली पुढच्या वेळेस त्या वेड्यासमोर एक जुनी पाच रुपयाची नोट आणि एक नवी करकरीत पन्नास रुपयांची नोट ठेवली तरीही त्या वेड्याने पाच रुपयांचीच नोट उचलली हे पाहून डॉक्टर आशर्यचकीत झाले आणि ओरडले अरे मूर्खा सगळ्या चाचण्या आरामात पार करतोय आणि शेवटच्या चाचणीत मात्र कायम चुकतोस तुला पाच आणि पन्नास यातील फरक कळत नाही का ?

वेडा शांतपणे म्हणाला ते मला चांगल कळत डॉक्टर साहेब ,पण इथून बाहेर पडलो की मला रोजच खर्च स्वता:ला करावा लागणार आहे त्यापेक्षा पाच रुपायाचे नाणे उचले की मला इथून बाहेर पडावे लागत नाही ,पाच रुपये ही मिळतात आणि खाने पिणे ही सगळे काही फुकटात होते मग मी पन्नास रुपयाची नोट उचलून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून का घेऊ ?

Comments

One response to “खरा वेडा कोणं”

  1. Datta shinde Avatar
    Datta shinde

    Nice story 💯

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *