बाजीगर

एका महाविद्यालयात संजय नावाचा एक विद्यार्थी शिक्षण घेत होता.अभ्यासाबरोबरच तो खेळातही प्रवीण होता. तो एक उत्कृष्ट नेमबाज होता. चांगले गुण व विनम्रता यामुळे तो शिक्षकामध्येही प्रिय होता.

एकदा महाविद्यालयात वार्षिक महोत्सव होता. यात नेमबाजीचीही स्पर्धा ठेवण्यात आली होती. इतर ठिकाणाहून अनेक विद्यार्थ्यानी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. प्रचार्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांशी परिचय करून घेताना दुसऱ्या शाळेतील गणेश नावाचा एक विद्यार्थी मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला की मी संजयला हरवणार आहे, त्याला हरवणे हे माझे उदिष्ट आहे शिक्षक मंदसे हसले आणि निघून गेले. कारण संजयला हरवणे इतके सोपे नव्हते. स्पर्धा सुरू झाली. एक एक करून सर्वानी बन मारला पण कोणालाही अचूक बाण मारता आला नाही. आत्ता गणेश आणि संजय दोघेच मुख्य प्रतिस्पर्धी उरले होते. यावेळेस गणेशने पुढाकार घेतला. त्याने पहिला बाण मारला तो अचूक लागला दूसरा बाण त्याचा त्याचा हुकला, तिसराही बाण त्याने अचूक मारला.

आता संजय उभा राहिला तेव्हा सर्वानी टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले. त्याने पहिला बाण सोडला त्याचा तो हुकला दूसरा हुकला आणि तिसराही हुकला. सर्व मुले व शिक्षक हिरमुसले. शिक्षकांना संजय हरला त्यावर विश्वासच बसत नव्हता.

त्यांनी त्याला साईडला बोलावले आणि कारण विचारले पण त्याने काहीही सांगितले नाही. शेवटी प्रचार्यानी विचारले तेव्हा त्याने सांगितले की गणेशची परिस्थिति खूप गरीब आहे या मिळालेल्या बक्षिसातून तो त्याची फी भरणार आहे.

सर माझ्या हरण्याने जर कोणाचे चांगले होत असेल तर मी सतत हरायला तयार आहे. उपस्थित असणाऱ्यांनी टाळ्या टाळ्या वाजवल्या . शिक्षकांनी त्याचा आदर्श विद्यार्थी म्हणून पुरस्कार केला.


Posted

in

by

Tags:

Comments

One response to “बाजीगर”

  1. Datta shinde Avatar
    Datta shinde

    Carect story 💯

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *