जिभेचा रस

एक म्हातारा प्रवासी थकला आणि राहण्यासाठी जागा शोधू लागला. एका बाईने त्याला तिच्या घरामध्ये राहण्यासाठी जागा सांगितली. म्हातारा तिथे शांत झोपला. सकाळी उठल्यावर, पुढे जाण्यापूर्वी त्याला वाटले की ही चांगली जागा आहे , इथे खिचडी शिजवावी आणि नंतर ती खाऊन पुढे प्रवास करावा.

म्हाताऱ्याने तिथे पडलेली सुखी लाकडं गोळा केली आणि विटांची चूल केली व खिचडी बनवायला सुरुवात केली. त्याने त्याच महिलेकडून पानी मागितले. त्या म्हाताऱ्याने त्या बाईचे लक्ष दुसरीकडे वळवले आणि म्हणाला, एक गोष्ट सांगू का? गोठ्याचा दरवाजा कमी रुंद आहे. समोरची म्हैस मेली तर उचलून बाहेर काढणार कशी ? या अनावश्यक कडू बोलण्याने त्या बाईला वाईट वाटलं, पण तो म्हातारा आहे आणि काही वेळाने निघून जाणार आहे, मग मी त्याच्याबद्दल का बोलावं असा विचार करून ती गप्प राहिली. नंतर दुसरीकडे महिला काही कामासाठी कुंपणाजवळ गेली तेव्हा चुलीवरची खिचडी अर्धीच शिजली होती. यावेळी म्हातारा पुन्हा तिला म्हणाला, तुझ्या हातातील बांगडी खूप मौल्यवान आहे. समजा तू विधवा झाली तर ते मोडावे लागेल त्याचे असे खूप नुकसान होईल?

यावेळी महिलेला रंग सहन झाला नाही. तिने धावत येऊन अर्धी शिजलेली खिचडी म्हाताऱ्याच्या भांड्यात टाकली आणि चुलीच्या आगीवर पानी ओतले. तिने आपले भांडे हिसकावून घेतले आणि वृद्धाला धक्का देऊन ढकलुन दिले.

तेव्हा वृद्धाला आपली चुक लक्षात आली. त्याने माफी मागितली आणि पुढे गेला. अर्ध्या शिजलेल्या खिचडीचे पाणी त्याच्या मंडक्यातून टपकत राहिले आणि त्यामुळे सगळे कपडे खराब होत राहिले. वाटेत लोकांनी विचारले हे सर्व काय आहे? म्हातारा म्हणाला माझ्या जिभेतून टपकणारा हा रस आहे जो आधी तुच्छतेचा कारणीभूत होता आणि आता हसतो आहे.

बोध :-

मित्रांनो , म्हणून अर्थ आधी तोलून मग बोला. तुम्ही कमी बोला, वा कितीही बोला पण गोड बोला आणि विचारपूर्वक बोला.

Comments

One response to “जिभेचा रस”

  1. Datta shinde Avatar
    Datta shinde

    💯

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *