परोपकाराचे फळ

कथा

एकदा एका गावात काही गावकरी एका सापाला मारत होते, त्याच रस्त्याने संत एकनाथ चालले होते. गर्दी पाहून संत एकनाथही तेथे पोहचले आणि म्हणाले, बंधुनो तुम्ही या प्राण्याला का मारताय, साप असला म्हणून काय झालं हा सुद्धा एक आत्मा आहे? तेवढ्यात गर्दीत उभा असलेला एक तरुण म्हणाला, “आत्मा आहे तरी तो का चावतो? त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून संत एकनाथ म्हणाले, जर तुम्ही विनाकारण सापाला मारले तर तो तुम्हाला चावणारच. जर तुम्ही त्याला मारलं नाही तर तो तुम्हाला का चावेल. गावातील लोकं संत एकनाथांचा खूप आदर करत, त्यामुळे एकनाथांचे म्हणणे ऐकून लोकांनी सापाला सोडून दिले

काही दिवसांनी एकनाथ पहाटे सकाळी घाटावर स्नान करण्यासाठी जात होते. तेव्हा वाटेत त्यांना फना पसरवणारा साप दिसला. संत एकनाथांनी त्याला रस्तावरून हटवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो साप जागचा हटला नाही शेवटी एकनाथ मागे वळले आणि दुसऱ्या घाटावर अंघोळीसाठी गेले. उजाडल्यावर ते परत आले आणि पाहिलं की पावसामुळे रस्त्यावर खड्डा पडला होता. सापाने त्यांना वाचवले होते.जर सापाने त्यांना वाचवले नसते तर संत एकनाथ त्या खड्ड्यात पडले असते.

मित्रांनो,

म्हणूनच असे म्हटले जाते की दयाळूपणा आणि परोपकाराचे नेहमी चांगले फळ मिळते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *