चमचे चोर

एका श्रीमंत गृहस्थाकडे मेजवाणीसाठी चाळीस जणांना बोलावले होते. त्यापैकी वीसजणांनी श्रीखंडाच्या वाटीत दिलेला एकेक चांदीचा चमचा जेवण झाल्यावर चाटून व स्वच्छ करून आपापल्या खिशात घातला. नोकराने ही गोष्ट मालकांच्या दृष्टीस आणताच मालक हाती लागलेले वीस चमचे घेऊन निमंत्रित पाहुण्यांसामोर आले आणि त्यांना उद्देशून म्हणाले, आपण सर्व जण माझ्या निमंत्राला मान देऊन जेवायला आलात, म्हणून मला अतिशय आनंद झाला आहे. तुम्हीही आता घरी जायला निघाला आहात. माझ्याकडे येऊन मला जस तुम्ही आनंदी केलं तसेच तुम्हालाही आनंदी करून लावावे, म्हणून मी माझ्या अंगात असलेल्या जादूच्या कलेची थोडीशी चुणूक दाखवतो.

असे बोलून त्याने आपल्या हातात असलेले वीस चमचे मोजून दाखवले, चतुर मालक पुढं म्हणाले आता माझ्या हातात असलेले चमचे बरोबर वीस आहेत. हे मी तुम्हाला मोजून दाखविले तेव्हा हे वीस चमचे मी तुमच्यापैकी वीस जणांच्या खिशातून काढून दाखवतो, असे म्हणून त्यांनी हातातील वीस चमचे खिशात घातले नंतर त्यांनी प्रत्येक पाहुण्यांचा खिसा तपासला आणि चोरांच्या खिशातून एकूण वीस चमचे बाहेर काढले व ते आपल्या नोकरच्या स्वाधीन केले.

बोध :-

आलेल्या पाहुण्यांचा अपमान होऊ न देता, चोरीस गेलेले सर्व चमचे मिळवण्यासाठी त्या गृहस्थाची युक्ति खरोखरच किती अपूर्व होती.


Posted

in

,

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *