स्वत:ची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करा…

एक गाढव होते. आणि त्याचे स्वप्न होते की आयुष्यात काहीतरी मोठे करायचे की ज्यामुळे आपण मेल्यानंतरही लोकं आपलं नाव घेतील. त्याचा एक मालक होता. त्याचही स्वप्न होत तो त्याच्या क्षेत्रात खुप मोठा व्यापारी बनावे.तो त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपल्या गाढवाकडून दिवस रात्र कष्ट करुन घ्यायचा. तो त्या पाठीवर जास्तीत जास्त माल लादत असे की ज्याच्यामुळे त्याला जास्तीत जास्त पैसे मिळतील. गाढव या भीतीने की मालक त्याच्या कामात कधी कमी नाही पडावा आणि अयशस्वी नाही व्हावा व त्याला खायला काही कमी नाही पडावं म्हणुन आपल्या मालकाला सोडु शकत नव्हता. आणि पुर्ण आयुष्य आपल्या मालकाची स्वप्न पुर्ण कष्ट करत राहतो. गाढव म्हातार झाल्यावर कोणतेही काम करु शकत नाही तेव्हा त्याचा मालक त्याला एका जंगलात मरण्यासाठी सोडुन देतो. जेव्हा गाढव मरणाच्या दारात असतं तेव्हा ते विचार करत की काय झालं असत जर मी एकदा माझे स्वप्न करण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले असते आणि हिमंत दाखवली असती तर आणि शेवटी गाढव मरण पावत.

बोध:-

 मित्रानो सांगायच झालं तर आज काल खुप लोकाची अवस्था त्या गाढवाप्रमाणे झाली आहे जी स्वताची स्वप्न पुर्ण करायचं सोडुन दुसऱ्या कोणाची तरी स्वप्न करण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करतात आणि स्वताच्या क्षमतेवर नाराज होतात. म्हणुन मित्रानो स्वताची स्वप्न पुर्ण करण्यासाठी काम करा .

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *