मानवता

एकादशीच्या दुसऱ्या दिवशी एक साधू एका सज्जन व्यापाऱ्याच्या दुकानात दान मागण्यासाठी आला.त्या सज्जन व्यापाऱ्याने एक रुपयाचे नाणे काढून त्या साधूला दिले.

साधूला तहान लागली होती, तो म्हणाला बाबूजी, मला प्यायला एक ग्लास पाणी द्या, घशाला कोरड पडली आहे. सज्जन व्यापारी रागात म्हणाला तुझ्या बापाचे नोकर बसलो आहोत का इथे? आधी पैसे, आता पाणी, काही वेळाने तु भाकरी मागशील,चल पळ इथून.

साधू म्हणाला:- बाबूजी, रागावू नका, मी नंतर कुठेतरी पाणी पिईन, पण मला आठवतंय, काल या दुकानाच्या बाहेर गोड शरबत ठेवलें होते आणि तुम्हीच लोकांना थांबवत होता आणि जबरदस्तीने आपल्या हाताने ग्लास भरत होता. . मला काल तुमच्या हातातून दोन ग्लास शरबत प्यायला मिळाले होते. मी तर हा विचार केला मला वाटलं, तूम्ही खूप धार्मिक माणूस आहात, पण आज माझा भ्रम तुटला.काल शरबत कदाचित तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी वाटत होता.

आज माझ्याशी कडू बोलून, तूम्ही कालचे सर्व पुण्य गमावले आहेस. जर मी जास्त बोललो असेल तर मला माफ करा.

त्या सज्जन व्यापाऱ्याला ही बाब मनाला भावली, गेल्या दिवसाचे प्रत्येक दृश्य डोळ्यासमोर तरळले. त्याला त्याची चूक कळत होती. तो स्वतः आपल्या आसनावरून उठला, त्याने स्वतःच्या हातांनी पाण्याचा ग्लास भरला आणि तो साधू बाबांना दिला आणि त्यांच्या क्षमासाठी प्रार्थना करू लागला.

साधू :- बाबूजी, माझी तुमच्याशी काही तक्रार नाही, पण जर तुम्ही तुमच्या मनाच्या खोलात माणुसकी रुजवू शकत नसाल, तर एक-दोन दिवस केलेली सत्कर्म व्यर्थ आहे.

मानवतेचा अर्थ नेहमीच मानवाची आणि प्राण्यांची सभ्यतेने सेवा करणे आहे.

तुम्हाला तुमची चूक कळली,तर ही तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी चांगली गोष्ट आहे.

तूम्ही आणि तुमचे कुटुंब सदैव निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच माझी इच्छा आहे, असे म्हणत तो साधू बाबा पुढे गेला.

सेठने लगेच आपल्या मुलाला हुकूम दिला आणि म्हणाला, उद्यापासून दुकानासमोर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांसाठी पाण्याचे दोन घागरी ठेवा. आपली चूक सुधारण्यात त्याला खूप आनंद होत होता.

बोध

केवळ दिखाव्यासाठी केलेली चांगली कृत्ये निरर्थक, व्यर्थ, निष्फळ आहेत, प्रत्येक जीवासाठी आपल्या मनात नेहमी शुभकामना आणि चांगल्या भावना असणे, हेच खरे पुण्य आहे.


Posted

in

, ,

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *